अमरावतीनंतर आता 'या' जिल्ह्यात शनिवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ८ पर्यंत संचारबंदी

Coronavirus updates: राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता अनेक जिल्ह्यांत, शहरांत कोविड नियमांची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

corona_update
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: PTI

वर्धा : वर्धा शहर (Wardha City) आणि ग्रामीण (Wardha rural) भागांमध्ये दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आणि त्यांची रुग्णसंख्या नियंत्रणासाठी तसेच कोरोना विषाणूच्या संक्रमणाची साखळी तोडण्याकरीता कोरोना चाचणी, लक्षणे असलेल्या व्यक्तीबाबत विलगीकरण, दंडात्मक कारवाई करण्याची कार्यवाही सुरू आहे. उपाययोजना म्हणून आठवड्यातील शनिवारी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संचारबंदी (Curfew) लागू केली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमजबजावणी करण्याकरीता यापूर्वीच वर्धा जिल्ह्यात १ फेब्रुवारी २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केले होते. मात्र, वाढती बाधितांची संख्या लक्षात घेता आता वीकेंड संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

संचारबंदीच्या काळात खालील सेवा पूर्णपणे बंद

 1. शनिवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ८ पर्यंत दुकाने, मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स येथील सर्व प्रकारची दुकाने (वैद्यकीय सेवा वगळता) इतर सर्व मार्केट बंद राहतील. 
 2. सर्व प्रकारची चहा, नाश्ता, पान टपरी आणि इतर वस्तू विक्री बंद राहणार
 3. सर्व प्रकारची हॉटेल्स, रेस्टॉरंट संचारबंदीच्या कालावधीत शनिवारी रात्री ८ ते सोमवार सकाळी ८ पर्यंत बंद राहणार.
 4. वर्धा शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या ट्रॅव्हल्स, खाजगी बसेस, खाजगी सर्व प्रकारची वाहतूक, एस.टी. बस सेवा तसेच नगरपालिका हद्दीतील व जिल्ह्यातील ऑटो रिक्षा सेवा नागरिकांसाठी बंद राहणार.
 5. आपत्कालीन परिस्थितीत आणि रुग्णांच्या सेवेसाठी नागरिकांसाठी ऑटो रिक्षाची सेवा आणि स्वत:चे खाजगी वाहनांची सेवा घेण्याची मुभा.
 6. वर्धा शहर व ग्रामीण भागातील सर्व जिम व्यायाम शाळा, जलतरण तलाव ह्या उपरोक्त नमुद केलेल्या संचारबंदी कालावधीत बंद राहणार. 
 7. वर्धा शहर आणि ग्रामीण भागातील सर्व चित्रपटगृहे / सिनेमागृहे उपरोक्त नमुद केलेल्या संचारबंदी कालावधीत बंद राहतील. 
 8. वर्धा शहर व ग्रामीण भागातील सर्व प्रकारची शासकीय व खाजगी वाचनालये ग्रंथालय, आठवडी बाजार, गुरांचे बाजार, वाहन दुरुस्त गॅरेज, सर्व प्रकारची बांधकामे, सलून, ब्यूटी पार्लर बंद राहणार
 9. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिसूचित भाजीपाला व फळ यार्ड बंद राहणार
 10. वर्धा शहरातील सर्व पर्यटन स्थळे, उद्याने, बगीचे, पार्क, मनोरंजन पार्क, ऐतिहासिक स्थळे तसेच ग्रामीण भागात असलेली सर्व वन पर्यटन स्थळे बंद राहणार.
 11. सर्व राष्ट्रीयकृत सरकारी बँका, खाजगी बँका, सहकारी संस्था, पतपेढी संस्था आणि आर्थिक बाबींशी संबंधित असलेल्या सर्व वित्तीय संस्था बंद राहतील. 
 12. विनाकारण चारचाकी व दुचाकी वरुन वाहतूक करताना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक व फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येईल.

संचारबंदीच्या काळात खालील सेवा सुरू राहणार

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी