वर्धा : वर्धा शहर (Wardha City) आणि ग्रामीण (Wardha rural) भागांमध्ये दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आणि त्यांची रुग्णसंख्या नियंत्रणासाठी तसेच कोरोना विषाणूच्या संक्रमणाची साखळी तोडण्याकरीता कोरोना चाचणी, लक्षणे असलेल्या व्यक्तीबाबत विलगीकरण, दंडात्मक कारवाई करण्याची कार्यवाही सुरू आहे. उपाययोजना म्हणून आठवड्यातील शनिवारी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संचारबंदी (Curfew) लागू केली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमजबजावणी करण्याकरीता यापूर्वीच वर्धा जिल्ह्यात १ फेब्रुवारी २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केले होते. मात्र, वाढती बाधितांची संख्या लक्षात घेता आता वीकेंड संचारबंदी लागू करण्यात आली आहे.