Corona Virus : दिल्लीहून येणार्‍या प्रवाशांमुळे नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, पालकमंत्री नितीन राऊत यांचा दावा

नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दिल्लीहून आलेल्या प्रवाशांमुळे कोरोना संसर्ग वाढत आहे असा दावा ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. दिल्लीहून आलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी करावी तसेच ग्रामीण भागात कोरोना चाचणी वाढवण्याचे आदेशही प्रशासनाला दिल्याचे राऊत म्हणाले.

थोडं पण कामाचं
  • नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.
  • दिल्लीहून आलेल्या प्रवाशांमुळे कोरोना संसर्ग वाढत आहे असा दावा ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केला आहे.
  • दिल्लीहून आलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी करावी तसेच ग्रामीण भागात कोरोना चाचणी वाढवण्याचे आदेशही प्रशासनाला दिल्याचे राऊत म्हणाले.

Corona Virus : नागपूर : नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दिल्लीहून आलेल्या प्रवाशांमुळे कोरोना संसर्ग वाढत आहे असा दावा ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. दिल्लीहून आलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी करावी तसेच ग्रामीण भागात कोरोना चाचणी वाढवण्याचे आदेशही प्रशासनाला दिल्याचे राऊत म्हणाले.

नागपुरात नितीन राऊत म्हणाले की,  आजच आपण प्रशासनासोबत बैठक घेतली. तेव्हा अधिकार्‍यांसोबत बोलताना असे निदर्शनास आले की दिल्लीहून आलेल्या प्रवाशांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. विमानतळावरच कोरोना चाचणी करावी असे आदेश देण्यात आले आहेत.  कोरोनाचा रुग्ण आढळल्यास त्याला तत्काळ क्वारंटाईन करून उपचार सुरू करता येतील त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, तसेच आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्यार भर असणार आहे असेही राऊत म्हणाले.

राज्यात विजेचे संकट नाही

सध्या राज्यावर विजेचे कुठलेही संकट नाही अशी माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली. तसेच  राज्यात मुबलक प्रमाणात कोळसा उपलब्ध आहे. वेळेपूर्वीच गरजेपूरता कोळसा आपण आयात केलेला आहेत यामुळे कोळश्याची टंचाई निर्माण होणार नाही असे राऊत म्हणाले. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी