नाना पटोलेंच्या 'या' विधानामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, काय म्हणाले पटोले?

नागपूर
अजहर शेख
Updated Jun 11, 2021 | 22:16 IST

Due to Nana Patole's statement, discussions in political circles : जर पोटनिवडणूक झाली तर अमरावती लोकसभेची जागा काँग्रेसच्या कोट्यात आहे त्यामुळे अमरावतीची जागा काँग्रेस लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Due to Nana Patole's statement, discussions in political circles
नाना पटोलेंच्या 'या' विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • भाजपमधून कॉंग्रेसमध्ये येणाऱ्यांची माझ्याकडे मोठी लिस्ट तयार आहे – नाना पटोले
  • अमरावती लोकसभेची जागा काँग्रेसच्या कोट्यात आहे त्यामुळे अमरावतीची जागा काँग्रेस लढणार
  • नाना पटोले यांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा

अमरावती : महाविकासआघाडीची सत्ता ५ वर्षे टिकणार नसल्याचे भाकीत अनेक वेळा भाजपच्या नेत्यांनी वर्तविले आहे. मात्र, आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारतीय जनता पार्टीतील अनेकजण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत असा दावा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. राज्यात शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) या तिन्ही पक्षांची एकत्रित सत्ता असली तरी आगामी निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. यासाठी काँग्रेस पक्षाने तयारी सुद्धा सुरू केली असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. पटोले यांच्या या विधानाने मोठी खळबळ उडाली आहे.

भाजपमधून कॉंग्रेसमध्ये येणाऱ्यांची माझ्याकडे मोठी लिस्ट तयार आहे – नाना पटोले

भाजपमधून अनेक लोक काँग्रेस पक्षात येण्यास तयार आहेत, भाजपमधून कॉंग्रेसमध्ये येणाऱ्यांची  माझ्याकडे मोठी लिस्ट देखील तयार असल्याचे पटोले यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत या प्रश्नावर नाना पटोले यांनी हे उत्तर दिले आहे.  नाना पटोले यांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. नाना पटोले यांनी केलेल्या या विधानावरून काँग्रेस प्रवेशासाठी इच्छुक असलेले ते भाजप नेते कोण? असा सवालही उपस्थित झाला आहे.

अमरावती लोकसभेची जागा काँग्रेसच्या कोट्यात आहे त्यामुळे अमरावतीची जागा काँग्रेस लढणार

काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे जात न्यायालयाने वैधता प्रमाणपत्र रद्द ठरवले आहे. नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैद्य ठरवल्याने या जागेवर पुन्हा निवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जाय लागली आहे. दरम्यान, अमरावती लोकसभेसाठी पोट निवडणूक झाल्यास ती कोण लढवणार? असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना नाना पटोले म्हणालेकी, अमरावती लोकसभेची जागा काँग्रेसच्या कोट्यात आहे त्यामुळे अमरावतीची जागा काँग्रेस लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

नाना पटोलेंच्या विधानाने आघाडीत बिघाडी?

नाना पटोले यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तसेच विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केल असून, नानांनी केलेल्या या विधानामुळे आघाडीत बिघाडी झाली असल्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे .तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत व विधानसभा निवडणुकीत आघाडीत फूट पडणार असल्याचे चिन्ह दिसू लागले आहेत. 

नवनीत राणांना हायकोर्टाकडून २ लाखांचा दंड 

 नवनीत राणा यांची हे खोटे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हायकोर्टाने हे प्रमाणपत्र रद्द केले आहे. तसंच, नवनीत राणांना हायकोर्टाकडून २ लाखांचा दंड ठोठावला आहे. सदर दाव्याचा निकाल आज दिनांक ८ जून रोजी घोषीत करण्यात आला. खासदार नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र खोटं असल्याबाबत शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळ (anandrao adsul) यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी