Cotton Seeds : राज्य सरकारच्या परिपत्रकामुळे बळीराजानं बियाण्यासाठी पकडली परराज्यांची वाट

नागपूर
भरत जाधव
Updated May 24, 2022 | 15:10 IST

कापूस उत्पादक (Cotton) शेतकर्‍यांना (farmers) एक जून पूर्वी कापसाचे बियाणे (Cotton seeds) विक्री करू नये, असे परिपत्रक राज्य सरकारने (State Government) काढल्याने यवतमाळ जिल्ह्यातील (Yavatmal District) शेतकऱ्यांनी तेलंगणा (Telangana) आणि आंध्रप्रदेशची (Andhra Pradesh) वाट पकडली आहे.

 Time for farmers to buy seeds from Telangana, Andhra Pradesh
शेतकर्‍यांवर तेलंगणा, आंध्रप्रदेशातून बियाणे खरेदीची वेळ  |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • यवतमाळ जिल्ह्याची ओळख पांढर्‍या सोन्याचा जिल्हा म्हणून आहे.
  • अल्पभूधारक शेतकरी तर कापसाशिवाय दुसर्‍या पिकाची लागवडच करत नाही.
  • दरवर्षी शेतकरी 15 मे पासून बियाणे खरेदीला सुरुवात करतात.

यवतमाळ : कापूस उत्पादक (Cotton) शेतकर्‍यांना (farmers) एक जून पूर्वी कापसाचे बियाणे (Cotton seeds) विक्री करू नये, असे परिपत्रक राज्य सरकारने (State Government) काढल्याने यवतमाळ जिल्ह्यातील (Yavatmal District) शेतकऱ्यांनी तेलंगणा (Telangana) आणि आंध्रप्रदेशची (Andhra Pradesh) वाट पकडली आहे. या राज्यात जाऊन शेतकरी बियाणे खरेदी करत असून कापूस बियाणे खरेदीसाठी शेतकर्‍यांची तारांबळ उडत आहे. 

दरम्यान, यवतमाळ जिल्ह्याची ओळख पांढर्‍या सोन्याचा जिल्हा म्हणून आहे. येथील शेतकरी कापसाच्या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहतात. त्यामुळे बहुतांश शेतकरी कापूस लागवडीला प्राधान्य देतात. अल्पभूधारक शेतकरी तर कापसाशिवाय दुसर्‍या पिकाची लागवडच करत नाही. हे पीक त्यांच्यासाठी हमखास उत्पन्न देणार आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्ष पासून कापसाचीच लागवड ते करत आहेत. सध्या बाजार पेठेत कापसाचे बियाणे मिळत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची बियाण्यासाठी परराज्यात भटकंती सुरू आहे.

येत्या खरीप हंगामात यवतमाळ जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर कापूस लागवड होणार आहे. दरवर्षी शेतकरी 15 मे पासून बियाणे खरेदीला सुरुवात करतात. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 80 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला तर कापसाची लागवड करतात. शेतकरी एकदा बाजारात आला की खत आणि बियाणे सोबतच विकत घेतात. त्यामुळे त्याला शेतीचे काम बाजूला ठेऊन वारंवार बाजारात येण्याची गरज भासत आहे. जिल्ह्यातील ज्या शेतकर्‍यांकडे मुबलक पाण्याची सोय आहे. असे शेतकरी मान्सून पूर्व कापसाची लागवड करायचे आणि भरघोस उत्पन्नही घेत होते. मात्र अलीकडे गुलाबी बोंड अळीने चांगलाच कहर केला आहे. 
बोंड अळीची सायकल तोडायची असेल तर विक्रेत्याने कापसाचे बियाणे शेतकर्‍यांना 1 जून पूर्वी देऊ, नये असे परिपत्रक काढले. त्यामुळे कापसाची किंमत वाढण्याच्या भीती पोटी शेतकरी बाहेरच्या राज्यातून बियाणे खरेदी करत आहेत.

वेळेवर शेतीचे नियोजन केल्या जाऊ शकत नाही. त्यामुळे शेतकरी बियाण्यासाठी धावपळ करत आहे. कापसाची लागवड उशिरा केली तर बोंड अळी येणार नाही. अशी हमी सरकार देणार काय, असा प्रश्न शेतकर्‍यांकडून विचारला जात आहे. यंदा मॉन्सून वेळेवर धडकणार आहे. पेरणीसाठी शेतकरी तयार असले तरी कृषी केंद्रातून बियाणे विक्री करण्यात येत नाही. एक जूनपूर्वी बियाणे मिळणार नाही, असे सांगितले जाते. बोंडअळी कधीही येते. त्यामुळे लवकरात लवकर बियाणे मिळाले पाहिजे. बियाणे एक जून नंतर विक्री करण्याचे आदेश आहे. ही तारीख शेतकर्‍यांसाठी अडचणीची आहे. 18 लाख पॅकेटची विक्री करायची आहे. यंदा मॉन्सून लवकर येणार आहे. बियाणे नसल्यास शेतकर्‍यांची पेरणीसाठी तारांबळ उडणार आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी