सतीश उकेंच्या घरावर ईडीची धाड, फडणवीसांचे कट्टर विरोधक मानले जातात सतीश उके

Ed raids the house of advocate satish uke at nagpur : वकील सतीश उके यांनी अनेक प्रकरणांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडीचे नेते आणि मंत्र्यांवर ईडी कारवाई करत असल्याचं समोर आले असून, फडणवीस यांच्या कट्टर विरोधक असलेल्या वकीलावर देखील ईडीने मारलेल्या छाप्यानंतर उलट-सुलट चर्चा सुरु आहे.

Ed raids the house of advocate satish uke at nagpur
फडणवीसांचे कट्टर विरोधक वकील सतीश उकेंच्या घरावर ईडीची धाड  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सतीश उके हे देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर विरोधक मानले जातात
  • सतीश उके हे जमीन व्यवहार प्रकरणामुळे अडचणीत आले होते
  • उकेंच्या घरी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नागपूर  : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर विरोधक असलेले वकील सतीश उके ययांच्या घरावर यांच्या घरावर आज सकाळी केंद्रीय तपास संस्थेने धाड टाकली आहे. सकाळपासून उके यांच्या घराची झाडाझडती सुरू आहे. वकील सतीश उके यांच्या घरावर पडलेल्या धाडीनंतर नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. सतीश उके हे देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर विरोधक मानले जात असून  यापूर्वी उके यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात पोलिसात तक्रारी दिल्या होत्या.

अधिक वाचा : आता इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी किमान वय असेल सहा वर्षे

सतीश उके हे जमीन व्यवहार प्रकरणामुळे अडचणीत आले होते

वकील सतीश उके यांनी अनेक प्रकरणांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे नेते आणि मंत्र्यांवर ईडी कारवाई करत आहे.  फडणवीस यांच्या कट्टर विरोधक असलेल्या वकिलावरही  ईडीने छापा मारला होता, त्यानंतर उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या  आहेत. दरम्यान, सतीश उके हे जमीन व्यवहार प्रकरणामुळे अडचणीत आले होते, त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप देखील होते. त्यातूनच ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे. एवढंच नाहीतर जस्टिस लोया प्रकरण, निमगडे हत्याकांड, चंद्रशेखर बावनकुळे  भ्रष्ट्राचार प्रकरण या संदर्भात त्यांनी वारंवार प्रश्न उपस्थित केले होते.

अधिक वाचा : मोफत अर्धा लिटर हवंय मग देशाच्या जुन्या पक्षाकडे जा..

उकेंच्या घरी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी क्राईम ब्रांचने उके यांनी जमीन व्यवहाराबाबत नोटीस बजावली होती. या प्रकरणातून छापा टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे. उकेंच्या घरी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास ईडीने छापा टाकला. सतीश उके आणि त्यांचे भाऊ हे घरीच आहे. सतीश उके हे नागपुरातील पार्वतीनगर भागात राहतात. त्यांच्या घरावर पडलेल्या छाप्यानंतर नागपुरात मोठी खळबळ उडाली आहे.

अधिक वाचा : मोदी सरकार खरेदी करणार 15 लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर 

यांनी फोन टॅप प्रकरणात नाना पटोले यांची केस लढवली आहे

फडणवीस यांच्याविरोधात २०१४  मध्ये प्रतिज्ञापत्रात दोन खटले लपवल्याचा आरोप करत याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून फडणवीसांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. या प्रकरणामुळे उके आणि भाजप आमनेसामने आले होते. त्याचबरोबर विशेष म्हणजे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे नागपूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी संजय राऊत आणि सतीश उके यांची भेट झाली होती. सतीश उके यांनी फोन टॅप प्रकरणात नाना पटोले यांची केस लढवली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी