वाढदिवशीच इंजिनिअर तरुणाचा मृत्यू, वडिलांना आला घातपाताचा संशय

Death of an engineer on the birthday in buldhana ;गौरव जाधव असं मृत इंजिनिअर मुलाचे नाव आहे. गौरवचा मृत्यू हा त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीचं अचानकपणे झाल्याने गौरवच्या वडिलांनी त्याच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला आहे. माझ्या मुलाचा खून झाला आहे, असं म्हणत त्यांनी खामगाव पोलिसांत तक्रार देखील दाखल केली आहे.

Death of an engineer on the  birthday in buldhana
वाढदिवसाच्या दिवशीच इंजिनिअर तरुणाचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वाढदिवसादिवशीचं एका इंजिनिअर तरुणाचा मृत्यू
  • मित्राचा फोन आल्याने सदर इंजिनिअर तरुण हा घराबाहेर पडला होता
  • काही वेळाने गौरवचा फोन अपघात झाल्याची माहिती त्याच्या वडिलांना देण्यात आली

बुलढाणा : वाढदिवसादिवशीचं ( Birthaday ) एका इंजिनिअर तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी बुलढाणा जिल्ह्यातून ( Buldhana District ) समोर आली आहे. वाढदिवस असल्याने इंजिनिअर तरुणाला त्याच्या मित्राने वाढदिवस साजरा करण्यासाठी फोन केला होता. मित्राचा फोन आल्याने सदर इंजिनिअर तरुण हा घराबाहेर पडला होता. त्यानंतर काही वेळाने त्याचा मृत्यू ( Death ) झाल्याची बातमी समोर आली.(engineer yout died on birthday family member suspects murder)

अधिक वाचा ; सुंदर आणि चमकदार केस हवे आहेत? मग करा हे घरगुती उपाय

 मृतक मुलाच्या पित्याने मृत्यूवर संशय व्यक्त केला

गौरव जाधव असं मृत इंजिनिअर मुलाचे नाव आहे. गौरवचा मृत्यू हा त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीचं अचानकपणे झाल्याने गौरवच्या वडिलांनी त्याच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला आहे. माझ्या मुलाचा खून झाला आहे, असं म्हणत त्यांनी खामगाव पोलिसांत तक्रार देखील दाखल केली आहे. दरम्यान, गौरवचा वाढदिवस असल्याने मित्राच्या फोननंतर बाहेर गेलेल्या इंजिनिअर मुलाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ माजली आहे.

अधिक वाचा ; या एका शेअरवर मिळणार मोफत 9 शेअर्स, गुंतवणुकदारांच्या उड्या 

गौरवचा अपघात झाला असल्याचे सांगण्यात आले होते

एकंदरीत घडलेली संपूर्ण घटना अशी आहे की, गौरव जाधव हा इंजिनिअर असून, त्याच्या वाढदिवस असल्याने त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या मित्रांनी त्याला फोन केला. त्यानंतर गौरवने त्याच्या कुटुंबातील सदस्यांना मी वाढदिवस साजरा करण्यासाठी जात असल्याचं सांगितले आणि तो घराबाहेर पडला. मात्र, वेळ झाला तरी तो घरी परतलाच नाही. नंतर त्याचा अपघात झाला असल्याचे गौरवच्या वडिलांना सांगण्यात आले. मात्र हा अपघात नसल्याचं गौरवच्या वडिलांचं म्हणणं आहे. तो अपघात नसून घातपात असल्याचा संशय गौरवच्या वडिलांना आहे. याबाबत त्यांनी शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलीस सध्या या घटनेचा पुढील तपास करत असून, अद्याप सदर प्रकरणात कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

अधिक वाचा ; फक्त 7000 रुपयांमध्ये नोकियाने आणला जबरदस्त 5G स्मार्टफोन 

अधिक वाचा ; अखंड भारताचे पहिले पंतप्रधान सुभाषचंद्र बोस : Rajnath Singh

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी