kirit somaiya On Uddhav Thackeray : मुख्यमंत्री हिंदुत्व सोडून हिरवेधारी झाले असले तरी त्यांची प्रकृती लवकर बरी होवो :  किरीट सोमय्या 

kirit somaiya Critisize CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोनाकाळात काम नव्हे तर खाली मान करून पैसे मोजत होते, स्वतःच्या बायकोचे  19 बेकायदेशीर बंगले वाचवण्यात व्यस्त होते असा निशाना किरीट सोमय्या यांनी साधला आहे.

Even if the Chief Minister leaves Hindutva and turns green his health will get better soon Kirit Somaiya
किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर केली खोचक टीका 
थोडं पण कामाचं
  • कोरोनाकाळात उद्धव ठाकरे काम नव्हे तर खालमानेने पैसे मोजत होते... 
  • स्वतःच्या बायकोचे 19 बेकायदेशीर बंगले वाचवण्यात व्यस्त होते... 
  • किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर साधला निशाना... 

kirit somaiya On Uddhav Thackeray । बुलढाणा :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोनाकाळात काम नव्हे तर खाली मान करून पैसे मोजत होते, स्वतःच्या बायकोचे  19 बेकायदेशीर बंगले वाचवण्यात व्यस्त होते असा निशाना किरीट सोमय्या यांनी साधला आहे... (Even if the Chief Minister leaves Hindutva and turns green, his health will get better soon: Kirit Somaiya)

कोरोनाच्या संपूर्ण काळात आपल्याला वर मान करायलाही वेळ मिळाला नाही एवढे काम होते, आणि त्यामुळेच मानेचा त्रास सुरू झाला असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते , या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना किरीट सोमय्या बोलत होते... उद्धव ठाकरे हे काम करण्यात नव्हे तर कोरोनाकाळात पैसे मोजण्यात व्यस्त होते, स्वतःच्या बायकोचे 19 बेकायदेशीर असलेले बंगले वाचवण्यात व्यस्त होते, अनिल परब यांना मदत करण्यात व्यस्त होते, असा टोला सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे... 

सोबतच आज त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली त्यामुळे महाराष्ट्राचे वर्तमान मुख्यमंत्री म्हणून मी एकटाच नव्हे तर देशातील जनता देखील त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे...भारतीय जनतेला हिंदुत्वाचा अभिमान असल्याने ते उद्धव ठाकरेंची प्रकृती बरी होण्याची देवाकडे प्रार्थना करत आहेत, भलेही ते हिरवेधारी झाले असले तरी... असा चिमटाही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना घेतला आहे...

बुलडाणा अर्बन पतसंस्था मध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांचे कोट्यवधी रुपये असल्याचा आरोप करत किरीट सोमय्या याबाबतीत पाठपुरावा करण्यासाठी बुलडाण्यात आले होते, त्यांनी यावेळी बुलडाणा अर्बन पतसंस्थेच्या मुख्य शाखेत जाऊन संचालकांशी चर्चा केली आणि चर्चे दरम्यान बुलडाणा अर्बन हे चांगल्या पद्धतीने आयकर विभागाच्या चौकशीला सहकार्य करत आहे आणि पुढेही करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी