Sanjay Rathore : सत्य समोर येण्यासाठीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता - आमदार संजय राठोड

राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या आमदार संजय राठोड यांच्या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले आहे. वनमंत्री असताना राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. पुजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यू प्रकरणी शिवसेना आमदार संजय राठोड यांना वनवाडी पोलिसांनी क्लिनचिट दिली आहे.

थोडं पण कामाचं
  • राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या आमदार संजय राठोड यांच्या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले आहे.
  • वनमंत्री असताना राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता.
  • पुजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यू प्रकरणी शिवसेना आमदार संजय राठोड यांना वनवाडी पोलिसांनी क्लिनचिट दिली आहे.

Sanjay Rathod : नागपूर : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या आमदार संजय राठोड यांच्या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले आहे. वनमंत्री असताना राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. पुजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यू प्रकरणी शिवसेना आमदार संजय राठोड यांना वनवाडी पोलिसांनी क्लिनचिट दिली आहे. तशी नोंदही राजपत्रात घेण्यात आली आहे. मात्र, आपल्याला त्या संदर्भात काही माहिती नसल्याचे माजी मंत्री संजय राठोड यांनी म्हटले आहे.

राठोड म्हणाले की, महंत पोलिस आयुक्तांना भेटले,  सत्य समोर येण्यासाठीच मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता अशी सावध भूमिका आमदार संजय राठोड यांनी व्यक्त केली. पूजा चव्हाणचा मृत्यू आत्महत्या किंवा अपघाती मृत्यू असल्याचा पुणे अहवाल पोलिसांनी दिला आहे. पूजाने आत्महत्या केल्यानंतर आमदार राठोड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यावेळी विरोधी पक्षातील नेत्यांनी आकांत तांडव केले होते. नैतिक जबाबदारी म्हणून आमदार राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.  दोन पक्षाच्या वादात आपला बळी घेतला गेला, असा आरोपही आमदार राठोड यांनी केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी