Shivsena : अकोला : काल रात्रीपासून नॉट रिचेबल असलेल्या आमदार नितीन देशमुख यांना आता स्थानिक शिवसैनिक सोडणार नाहीत. त्यांचं हे सर्व खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकरांचा यांनी दिला आहे. देशमुख हे भरवशाचे नसल्याची तक्रार पिजरकर यांनी याअगोदर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. अशी देखील माहिती समोर आली आहे. दरम्यान, विधान परिषदेच्या अकोला स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील गोपीकिशन बाजोरियांच्या पराभवानंतर पिंजरकरांनी आमदार देशमुखांवर भाजपकडून पैसे घेतल्याचे गंभीर आरोप केले होते.
अधिक वाचा : Zodiac Sign: या राशीचे लोक असतात खूप वायफळ खर्च करणारे...
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीचा झेंडा पुकारल्यानंतर अनेक आमदार नॉट रिचेबल असल्याचे पाहायला मिळत आहे. यात अकोल्यातही शिवसेना पक्षाचे नितीन देशमुख देशमुख हे देखील काल रात्रीपासून नॉट रिचेबल आहेत, नितीन देशमुख हे बाळापूर मतदारसंघातील आमदार असून ते एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जातात. आज देशमुख यांच्या पत्नीने पोलिसांकडे माझे पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात शिवसेनेचे अकोल्याचे माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी प्रतिक्रया दिली आहे.
अधिक वाचा : Dark Underarms मुळे Sleeveless घालणं मुश्किल, मग करा हे उपाय
अकोल्यात शिवसेना संपवण्यासाठीच देशमुख हे भाजपला नेहमीच मदत करतात, याबाबत अनेक तक्रारी पक्ष प्रमुखांकडे केल्या आहेत. मात्र त्यावर अद्याप तोडगा निघाला नाही. आज हे सर्व समोर आलं. पक्ष प्रमुख आदेश देणार, तो देणार. मात्र तोपर्यत आम्ही शांत बसणार नाही. या अगोदर स्थानिक शिवसैनिक देशमुख यांना सोडणार नाही, धडा शिकवणारचं, असा जाहीर इशारा पिंजरकरांनी देशमुखांना दिला आहे.
अधिक वाचा ; यंदाच्या आषाढीची पूजा फडणवीस करतील :- आ.जयकुमार गोरे
राज्यात कोणत्याही प्रकारचा भूकंप होणार नसल्याचं वक्तव्य शिवसेनेचे जेष्ठ नेते संजय राऊत यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. एकनाथ शिंदे हे आमचे जिवा भावाचे सहकारी आहेत. त्यांच्याबरोबर बोलणं होत नाही, तोपर्यंत मी काही बोलणार नसल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. आमचे शिवसैनिक आमच्याकडे परत येतील असेही राऊत म्हणाले. नाही असेही राऊत यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात मध्य प्रदेश आणि राजस्थान पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण हा प्रयत्न यशस्वी होणार नसल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.