Very Shocking ! सख्ख्या भावाकडून लहान बहिणीचे शोषण, पोट दुखत असल्याने घटना उघडकीस, आणि समोर आलं भयानक सत्य

नागपूर
Updated Jul 25, 2022 | 16:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

Exploitation of sister by brother: सदर घटनेतील आरोपी आणि पिडीत हे दोन्हीही अल्पवयीन आहेत. पिडीत मुलगी ही १५ वर्षाची आहे तर नराधम भाऊ हा १७ वर्षाचा आहे. दरम्यान, पीडिता सहा महिन्याची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब पुढे आल्यावर रुग्णालयातील डॉक्टरांनी थेट या घटनेची माहिती पोलिसांना कळवली. पोलिसांनी पीडितेची विचारपूस केली असता पीडित मुलगी काहीही बोलण्यास नकार देत आहे.

Exploitation of sister by brother, incident revealed due to stomach ache
सख्ख्या भावाकडून बहिणीचे शोषण,पोट दुखत असल्याने घटना उघड   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सख्ख्या भावानेच बहिनीचे शोषण केल्याची लाजिरवाणी घटना
  • पिडीतेचे पोट दुखत असल्याने घटना आली उघडकीस
  • प्रकरण सखी वन स्टॉप सेंटरकडे सोपविण्यात आले आहे

Crime news in marathi , वर्धा : सख्ख्या भावानेच बहिनीचे शोषण केल्याची लाजिरवाणी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्धा जिल्ह्यात हा धक्कदायक प्रकार घडला आहे. सदर घटनेने जिल्ह्यातचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. सदर घटनेत पीडीत मुलगी अल्पवयीन असून, तिचा भाऊ देखील अल्पवयीनचं असल्याची माहिती समोर येत आहे. पीडित मुलीचे पोट दुखत असल्याने सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात तिला तिच्या घराच्या लोकांनी घेऊन गेले असता पीडिता ६ महिन्याची गर्भवती असल्याचे सांगितले हे ऐकून तिच्या कुटुंबीयांनी मोठा धक्काच बसला आहे.

अधिक वाचा : आधार वोटर आयडी लिंक याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

पीडितेचे आई - वडिल बाहेर कामानिमित्त गेले होते

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई आणि वडील काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. यावेळी पीडित तरुणी आणि तिचा भाऊ हे दोघे घरी राहत होते. यादरम्यान, भावाने आपल्या बहिणीचे शोषण केले. अनेक दिवस भाऊ बहिणीचे शोषण करत होता. यानंतर पीडितेच्या पोटात दुखू लागल्याने तिला तिच्या घरच्यांनी सेवाग्राम येथील रुग्णालयात नेले असता ती गर्भवती असल्याची डॉक्टरांनी सांगितले. आपली अल्पवयीन मुलगी थेट गर्भवती असल्याचे ऐकून घरच्या लोकांना मोठा धक्का बसला. घरच्यांनी याबाबतची तक्रार शहर पोलिसात दिली. शहर पोलीस ठाण्यातील पोस्को सेलने घटनेचे गांभीर्य ओळखून पीडितेच्या भावाला ताब्यात घेतल्याची माहिती दिली.

 

प्रकरण सखी वन स्टॉप सेंटरकडे सोपविण्यात आले आहे

सदर घटनेतील आरोपी आणि पीडित हे दोन्हीही अल्पवयीन आहेत. पीडित मुलगी ही १५ वर्षाची आहे तर नराधम भाऊ हा १७ वर्षाचा आहे. दरम्यान, पीडिता सहा महिन्याची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब पुढे आल्यावर रुग्णालयातील डॉक्टरांनी थेट या घटनेची माहिती पोलिसांना कळवली. पोलिसांनी पीडितेची विचारपूस केली असता पीडित मुलगी काहीही बोलण्यास नकार देत आहे. यामुळे हे प्रकरण सखी वन स्टॉप सेंटरकडे सोपविण्यात आले असून, सेंटरच्या केंद्र प्रशासक यांनी पीडित मुलीचे समुपदेशन केले. पीडित मुलीला धीर देत विचारपूस केली असता पीडितेने घडलेला सर्व प्रकार पानावलेल्या डोळ्यांनी कथित केला. पीडितेचे तक्रार नोंदविल्यानंतर शहर पोलिसात भावाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

अधिक वाचा : एकाच सामन्यात झिरोवरून हिरो बनला टीम इंडियाचा हा ऑलराऊंडर

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी