मोदींनी कौतुक केलेला शेतकरी काँग्रेसमध्ये

नागपूर
अजहर शेख
Updated Jun 12, 2021 | 17:58 IST

Farmer praised by Modi join Congress पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात तोंडभरून कौतुक केलेल्या शेतकऱ्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Farmer praised by Modi join Congress
मोदींनी कौतुक केलेला शेतकरी काँग्रेसमध्ये  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • मोदी यांनी १६ नोव्हेंर २०१६ मध्ये मन की बात या कार्यक्रमात राऊत यांचं कौतुक केलं होतं
  • मुरलीधर राऊत यांच्या हॉटेल मराठामध्ये प्रवेश सोहळा पार पडला
  • राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात राऊत यांची जागा गेली होती

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra modi) यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात तोंडभरून कौतुक केलेल्या शेतकऱ्याने  काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. मोदींनी कौतुक केले असतानाही शेतकऱ्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अकोल्याचे शेतकरी मुरलीधर राऊत (Murlidhar raut) यांचं प्रधानमंत्री मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून (Mann Ki Baat) तोंडभरून कौतुक केलं होतं. शेतकरी मुरलीधर राऊत यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. Farmer praised by Modi join Congress

मोदी यांनी १६ नोव्हेंर २०१६ मध्ये मन की बात या कार्यक्रमात राऊत यांचं कौतुक केलं होतं

नोटबंदीच्या काळात राऊत यांनी पैसे नसणाऱ्या अनेक लोकांना मदत केली होती. आणि चक्क महामार्गावरून ये जा करणाऱ्यांना त्यांनी आपल्या हॉटेलमधून मोफत जेवण दिलं होतं. त्यांच्या या कार्याची पंतप्रधान मोदींनी दखल घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ नोव्हेंर २०१६ मध्ये राऊत यांचं कौतुक केलं होतं.

मुरलीधर राऊत यांच्या हॉटेल मराठामध्ये प्रवेश सोहळा पार पडला

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी ते अकोल्यात आले होते. त्यादरम्यान, मुरलीधर राऊत यांच्या काँग्रेस प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. सदर प्रवेश सोहळा मुरलीधर राऊत यांच्या हॉटेल मराठामध्ये पार पडला. बाळापूर तालुक्यातील पारस फाट्यावर हॉटेल मराठा नावाने मुरलीधर राऊत यांचे हॉटेल आहे. 

राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात राऊत यांची जागा गेली होती

राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात मुरलीधर राऊत यांची जागा गेली होती. राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात जागा जाऊन देखील राऊत यांना त्यातून त्यांना मोबदला मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी जमीन गेलेल्या इतर शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन भले मोठे आंदोलन छेडले होते. राऊत यांनी छेडलेल्या याच आंदोलनाची दखल काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेत मुद्दा उचलून धरला होता. त्यामुळे राऊत हे चांगलेच चर्चेत आले होते. दरम्यान, पूर्वी मुरलीधर राऊत यांच्याकडे शेती होती. 

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींचे त्यांनी मोफत लग्न लावून देण्याचा उपक्रम सुद्धा राबवला

. मागील वर्षी कोरोनाच्या काळात सुद्धा मुरलीधर राऊत यांनी आपल्या हॉटेलमध्ये अनेक मुलींची लग्न मोफत लावून दिली. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींचे त्यांनी मोफत लग्न लावून देण्याचा उपक्रम सुद्धा राबवला होता

त्यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक सुद्धा लढवला होती. शेळद गावचे ते सरपंच राहिले होते. त्यांनी आपल्या गावात अनेक सामाजिक उपक्रम राबवले होते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींचे त्यांनी मोफत लग्न लावून देण्याचा उपक्रम सुद्धा राबवला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी