छगन जाधव, अमरावती :- विदर्भात शेतकऱ्यांची आत्महत्या सुरूच आहे. २००१ ते २०२२ पर्यंत विदर्भात २१,०८४ शेतकऱ्यांनी आपले आयुष्य संपवले. २०२२मध्ये सर्वात पहिली आत्महत्या अमरावतीत झाली. नुकतीच अमरावतीच्या जळगाव आर्वी येथील रमेश सहारे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली.
कृषीप्नधान देश म्हणून भारताला ओळखतात. मात्र इथल्या शेतकऱ्याला नुकसानाला सामोर जावे लागत आहे. अमरावती जिल्ह्यातील २ हजार लोकसंख्या असलेलं जळगाव आर्वी गाव. या गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याच प्रमुख काम म्हणजे शेती. मेहनती आणि होतकरू शेतकरी रमेश सहारे यांच्या आत्महत्येमुळे सध्या गावात शांतता पसरली आहे. निसर्गाच्या अनियमीत वातावरणामुळे सोयाबीनची खाद नष्ट झाली. त्यांच्याकडे २ एकर जमीन होती म्हणून रब्बी हंगामात पिक जोमाने वाढेल याची आशा त्याला होती. बाजारभाव मिळत नसळ्यामुळे रमेश तणावमध्ये होतो आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचा ६१ हजाराचा कर्ज , त्याचबरोबर खाजगी ३ लाखांचे कर्जाचा डोंगर कसा फेडायचा आणि संसाराची गाडी कशी सुरळीत चालावी या चिंतेत त्यांनी टोकाचा पाऊल उचलला. गळफास लावून त्यांनी पत्नी आणि ३ मुलांना पोरक केलं. आत्महत्या केल्याममुळे त्यांच कुटुंब उघड्यावर आल आहे. सध्या मोठ्या मुलावर घराची जबाबदारी आणि धर चालवण्यासाठी मजूरी करून लहान भावाच शिक्षण पूर्ण करत आहे. तर आई घरकाम सांभाळत शेतीकाम करते आहे.
विदर्भात शेतकऱ्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे, कर्जबाजारी पणाला कंटाळून यंदा १३२२ शेतकऱ्यांनी आपल जीवन संपविले आहेत. २०१४ साली याच परिसरात राहुल गांधी यांनी पायदळ जात आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची भेट घेतली होती. शेतकऱ्यांना सात्वना दिल्या पण विदर्भात शेतकऱ्यांची आत्महत्या थांबल्या नाहीत. सरकारने कर्जमाफी करणे म्हणजे उपाय नाही, त्यांना सक्षम करणे, शेतीविषयक योजना शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे, योजना राबविणे, आणि बदलत्या वातावरणानुसार पिके घेणे म्हणजे आत्महत्या थांबविणे असे मत शेती तज्ज्ञ चेतन परडखे यांनी व्यक्त केले आहे.
विदर्भात २००१ ते २०२२ दरम्यान शेतकरी आत्महत्या..
शेतकरी आत्महत्या २१०८४
पात्र प्रकरणे ९७७९
अपात्र प्रकरणे. ११००३
प्रलंबित प्रकरणे. ३०२
सर्वाधिक आत्महत्या अमरावतीत
अमरावती :- ३२१
अकोला :- १४३
वाशिम. :- १००
बुलढाणा :- ३१६
यवतमाळ. :- २९१
वर्धा :- १५१