Gadchiroli Naxal: चार तासाच्या चकमकीत 50 लाखांचं बक्षिस असलेला मिलिंद तेलतुंबडे उर्फ सह्याद्री ठार; कोण आहे हा तेलतुंबडे?

नागपूर
भरत जाधव
Updated Nov 14, 2021 | 16:48 IST

Gadchiroli Naxal:   महाराष्ट्र (Maharashtra)-छत्तीसगड (Chhattisgarh) सीमेलगत कोटगुल (Kotgul)-ग्यारापत्ती (Gyarapatti) जंगल (forest) परिसरात ‘सी-60’ पोलिसांशी (‘C-60’ police) झालेल्या चकमकीत (Encounter) शनिवारी 26 नक्षलवादी (Naxalites) ठार झाले.

Milind Teltumbde alias Sahyadri Milind killed in Encounter
Gadchiroli Naxal:चकमकीत मिलिंद तेलतुंबडे उर्फ सह्याद्री ठार  |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
 • नक्षल चकमकीत गडचिरोली पोलिसांनी तब्बल 26 नक्षल्यांना कंठस्नान घातलं.
 • चकमकीत कुख्यात माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार.
 • कोरेगाव भीमा प्रकरणात अटकेत असलेल्या आनंद तेलतुंबडे यांचा मिलिंद तेलतुंबडे भाऊ

Gadchiroli Naxal:  मुंबई : महाराष्ट्र (Maharashtra)-छत्तीसगड (Chhattisgarh) सीमेलगत कोटगुल (Kotgul)-ग्यारापत्ती (Gyarapatti) जंगल (forest) परिसरात ‘सी-60’ पोलिसांशी (‘C-60’ police) झालेल्या चकमकीत (Encounter) शनिवारी 26 नक्षलवादी (Naxalites) ठार झाले. सुमारे चार तास चाललेल्या या चकमकीत जहाल नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडेदेखील ठार झाला आहे. गडचिरोली पोलिसांनी या माहिती दुजोरा दिला असल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. दरम्यान या चकमकीत तीन पोलीस गंभीर जखमी झाले असून त्यांना हेलिकॉप्टरने नागपूर येथे हलवण्यात आले आहे.

काल झालेल्या नक्षल चकमकीत गडचिरोली पोलिसांनी तब्बल 26 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. चकमक झाल्यानंतर त्या भागात सर्चिंग ऑपरेशन दरम्यान 29 अत्याधुनिक शत्रसाठा आणि मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य, 26 नक्षल्यांचे शव रात्री उशिरा कोटकल पोलीस मदत केंद्रात पोहोचविण्यात आले. दरम्यान मारल्या गेलेल्या नक्षल्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. काल चकमकीनंतर शोध अभियानात रात्र झाल्याने घटनास्थळी शोधमोहीम थांबविण्यात आली होती. मात्र आज सकाळपासून परत एकदा या भागात शोध मोहीम राबवली जात आहे. 

कोण आहे उर्फ सह्याद्री नावाने ओळखला जाणारा मिलिंद तेलतुंबडे?

शनिवारी झालेल्या चकमकीत कुख्यात माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे हा ठार झाला आहे. कोरेगाव भीमा प्रकरणात अटकेत असलेल्या आनंद तेलतुंबडे यांचा मिलिंद तेलतुंबडे भाऊ आहे. भिमा-कोरेगाव हिंसाचाराचा सूत्रधार अशी पोलिसांत त्याची नोंद आहे. 1 मे 2019 रोजी गडचिरोलीत कुरखेडा – जांभुळखेडाज पोलिसांवर झालेल्या हल्ल्यामागे मिलिंद तेलतुंबडेचा हात असल्याचा संशय होता. त्याच्यावर 50 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आले होते. नक्षलवादी चळवळ शहरी भागात रुजवण्यात त्याचा हात होता. केंद्र सरकारच्या मोस्ट वॉण्टेड नक्षलवाद्यांच्या यादीत त्याचा सहभाग होता. त्याच्यावर हत्या देशद्रोहासह अनेक गुन्हे दाखल होते.

गेल्या अनेक मिलिंद तेलतुंबडे वर्षांपासून भूमिगत होता. तेलतुंबडे मूळचा महाराष्ट्रातील असून यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावचा रहिवासी होता. ३२ वर्षांपूर्वी त्याने चंद्रपूरला अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेतून कामाला सुरुवात केली होती. ‘वेकोलि’ कंपनीच्या अधिकाऱ्याच्या खुनानंतर तो बेपत्ता झाला. तो नक्षलींच्या केंद्रीय समितीचा सदस्य तसेच महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड क्षेत्रीय समितीचा प्रमुख म्हणून कार्यरत होता. कॉम्रेड एम, दीपक, सह्याद्री अशा वेगवेगळ्या नावांनी नक्षलवाद्यांमध्ये त्याची ओळख होती.

 • मिलिंद तेलतुंबडे हा 50 ला रुपयांचा इनाम असलेला नक्षलवाद्यांचा सर्वात मोठा नेता होता. 
 • मावोवादी सर्वोच्च सेंट्रल कमिटीचा सदस्य.
 • एल्गार परिषदेतील फरार आरोपी. 
 • एल्गारमधील कारावासात असलेला दुसरा आरोपी डॉक्टर आनंद तेलतुंबडेचा भाऊ.
 • पश्चिम भारताचे काम ज्यात महाराष्ट्र मुख्य ह्याचा प्रभारी. 
 • जंगल आणि अर्बन ह्या क्षेत्रातील दोन्हीवर कामाचा अधिकार.
 • एमएमसी म्हणजे महाराष्ट्र, छत्तीसगड व मध्य प्रदेश तिन्ही राज्यांचा एमएमसी असा गुरीला झोन याने विकसित केला आहे.
 • अॅंजेला सोनटक्के ही त्याची पत्नी. ही सुद्धा मावोवादी म्हणून पकडली गेली होती. 
 • मिलिंद हा वणी-राजुरा परिसरात लहानाचा मोठा झालेला.
 • शहरी भागात मावोवादी संघटनांमध्ये दलित समाजातील तरुणांना भरती करण्याचे विशेष लक्ष.
 • शस्त्र ट्रेनिंग देणे, ऑपरेशनला मान्यता देणे हे सुद्धा कामाचा भाग. त्यामुळे दशकभर पोलीस व सामान्य नागरिकांच्या हत्या मावोवाद्यांकडून झाल्या त्याला तेलतुंबडे जवाबदार.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी