तुझ्यासाठी मी एक सरप्राईज गिफ्ट आणलं आहे म्हणत डोळ्याला बांधली पट्टी आणि...

girlfriend tried to kill his boyfriend in bhandara district ; सदर घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर प्रेयसी आणि तिची साथ देणाऱ्या तिच्या प्रियकरावर जवाहरनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी शुक्रवारी दोघांना अटक देखील केली आहे.

girlfriend tried to kill his boyfriend in bhandara district
सरप्राईज गिफ्ट आणलं आहे म्हणत डोळ्याला बांधली पट्टी आणि.....  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भंडारा जिल्ह्यातून देखील एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे
  • तरुणीने चक्क आपल्या प्रियकराचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
  • प्रेयसी आणि तिची साथ देणाऱ्या प्रियकरावर गुन्हा दाखल

भंडारा : राज्यात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. भंडारा जिल्ह्यातून देखील एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीने चक्क आपल्या प्रियकराचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, सदर तरुणीला दोन प्रियकर असल्याची देखील माहिती समोर आली आहे. आरोपी तरुणीने आपल्या पहिल्या आपल्या पहिल्या प्रियकराच्या मदतीने दुसऱ्या प्रियकरावर हल्ला केला असल्याचे पोलीस सुत्रांकडून माहिती मिळाली आहे. आरोपी तरुणीन दुसऱ्या प्रियकराला सांगितलं की, तुझ्यासाठी मी एक सरप्राईज गिफ्ट आणलं आहे. यानंतर तरुणीने आपल्या प्रियकराला सांगितले की, तू तुझ्या डोळ्याला पट्टी बांध त्यानंतर तरुणीने प्रियकराच्या डोळ्याला पट्टी बांधली आणि आणि मग प्रियकरावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला.  

अधिक वाचा ; न थांबता 13 हजार 560 किमी उड्डाण करून पक्ष्याचा विश्वविक्रम

प्रेयसी आणि तिची साथ देणाऱ्या प्रियकरावर गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर प्रेयसी आणि तिची साथ देणाऱ्या तिच्या प्रियकरावर जवाहरनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी शुक्रवारी दोघांना अटक देखील केली आहे. गोकुळ नामदेव वंजारी असं या घटनेत जखमी झालेल्या प्रियकराचं नाव असून, ही धक्कादायक घटना भंडाऱ्याच्या झिरी देवस्थानच्या पहाडीवर घडली आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

अधिक वाचा ; टाटा एअरबस गुजरातमध्ये गेल्यानंतर CM शिंदेंची सावध भूमिका 

असा रचला गेला होता कट?

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटनेतील आरोपी प्रेयसी ही अल्पवयीन आहे. या अल्पवयीन मुलीचे नीरज पडोळे नावाच्या तरुणासोबत मागील चार वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होत अशी माहिती समोर आली आहे. यानंतर सदर 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही पाच ते सहा महिन्यांपासून गोकुळ वंजारी या तरुणासोबत रिलेशनशिपमध्ये आली. आपल्या प्रेयसीचे दुसऱ्या मुलासोबत रिलेशन वाढत असल्याने गोकुळला याचा राग आला आणि त्याने नीरजचा काटा काढायचा ठरवला. त्याने प्रेयसीला नीरजपासून लांब राहण्यास सांगितलं होतं. याच गोष्टीचा राग मनात धरून प्रेयसी आणि नीरजने गोकुळला टेकडीवर बोलावलं आणि त्याचा काटा काढण्याचा कट रचला अशी माहिती मिळाली आहे. यानंतर प्रेयसीने गोकुळला सरप्राईज गिफ्ट देण्याच्या बहाण्याने टेकडीवर बोलावलं. गोकुळ झिरी येथील देवस्थानच्या पहाडीवर गेला. तिथे त्याने गोकुळच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्याचे हातही बांधले. यानंतर तिने गोकुळवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला.

अधिक वाचा ; 'गोल्डन पॅराशूट'मुळे पराग अग्रवालला मस्ककडून मिळणार अब्जावधी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी