भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या (Bhandara district) साकोली बसस्थानकावर (Sakoli ST bus station) एक धक्कादायक घटना घडली आहे. सोन्याची बिस्किटे असेलेली बॅग एसटीतून लंपास केल्याची घटना साकोली बसस्थानकावर घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी जी बॅग लंपास केली आहे, त्या बॅगमध्ये तब्बल ३० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने होते. याप्रकरणी साकोली ठाण्यात रात्री तक्रार दिल्यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. दरम्यान, ज्या सराफा व्यापाऱ्याची बॅग चोरीला गेली आहे, तो देखील या बसमध्ये प्रवास करत होता. मात्र, तहान लागली म्हणून पाण्याची बाटली घेण्यासाठी तो बसखाली उतरला आणि लगेच चोरट्यांनी संधी साधत बॅग लंपास केली आहे. सदर घटना सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बस साकोली बसस्थानकावर घडली.
अधिक वाचा : वाढत्या कोरोना संकटामुळे बीएमसीनं जारी केली मार्गदर्शक तत्वे
सराफा व्यापाऱ्याच्या चोरी झालेल्या बॅगमध्ये तब्बल ३० लाख रुपयांची सोन्याचे दागिने होते. ज्यामध्ये ४ लाखांची ८२ ग्रॅम सोन्याची बिस्किटे होती. त्याचबरोबर, २५ लाख ९३ हजार रुपये किमतीचे ४७१ ग्रॅम सोन्याचे दागिने होते. राजेंद्रसिंग जसवंतसिंग राठोड वय २४ वर्ष (रा. नागाने, राजस्थान) असे दिवाणजीचे नाव असून, ते पुणे येथील भवरलाल त्रिलोकचंद अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड या फर्ममध्ये कार्यरत आहेत.
अधिक वाचा : इलॉन मस्कचा ट्विटरबरोबरचा सौदा रद्द? लपवाछपवी केल्याचा आरोप
राजेंद्रसिंग जसवंतसिंग राठोड हे ३० ते ३५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि बिस्किटे घेऊन ३० मे च्या रोजी निघाले होते. दरम्यान रायपूर, राजनगाव, बालाघाट आणि गोंदिया येथील सराफांना दागिने देऊन गोंदियावरून ते भंडारा येथे जाण्यासाठी सायंकाळी बसमध्ये बसले. मात्र, तहान लागल्याने बॅग बसमध्येच ठेवून पाण्याची बाटली घेण्यासाठी राठोड बसमधून खाली उतरला. परत येऊन पहिले तर बसमध्ये बॅग नव्हती. बॅग नसल्याचे पाहून दिवाणजी खूप घाबरला त्याने तत्काळ घडलेली घटना मालकाला सांगितली आणि पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी संपूर्ण चौकशी करून उशिरा रात्री गुन्हा नोंदविला. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांच्या टीम रवाना करण्यात आल्या आहे.
अधिक वाचा : हे ऑप्टिकल इल्युजन तुम्हाला सांगेल कोणती नोकरी करायला हवी...