Amravati Rain : अमरावतीत गारपिटीसह वादळी पाऊस, पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल

Amravati Rain अमरावती जिल्ह्यात आज गारपिटीसह वादळी पावसाने हजेरी लावली. विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.

थोडं पण कामाचं
  • अमरावती जिल्ह्यात आज गारपिटीसह वादळी पाऊस
  • पावसामुळे शेतकरी राजा पुन्हा एकदा संकटात
  • तूर, कपाशी, पिकांसह पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Amravati Rain : अमरावती : अमरावती जिल्ह्यात आज गारपिटीसह वादळी पावसाने हजेरी लावली. विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. आज अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात व चांदुरबाजार तालुक्यातील गारपिटीसह जोरदार वादळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.(hail storm and rain in amaravati district farmer lost crop) 

या पावसामुळे शेतकरी राजा पुन्हा एकदा संकटात आला आहे. शेतकऱ्यांचे तूर, कपाशी, पिकांसह पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पुढील दोन दिवस विदर्भात ढगाळ वातावरण राहील, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस व गारपीट होण्याची शक्यता असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी