Nagpur: हल्दीराम रेस्टॉरंटच्या सांबारमध्ये पालीचं पिल्लू, रेस्टॉरंट बंद 

नागपूर
Updated May 16, 2019 | 10:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

Dead lizard found in food at haldiram's outlet: नागपूरमधलं प्रसिद्ध फूड प्रोडक्ट हल्दीराम रेस्टॉरंटमध्ये ग्राहकाला दिलेल्या सांबारमध्ये मृत पालीचं पिल्लू आढळलं. त्यानंतर हे रेस्टॉरंट बंद करण्यात आलं आहे. 

Representative image
Nagpur: हल्दीराम रेस्टॉरंटच्या सांबारमध्ये पालीचं पिल्लू, रेस्टॉरंट बंद   |  फोटो सौजन्य: Getty Images

Dead lizard found in food at haldiram's outlet: नागपूर येथील प्रसिद्ध फूड प्रोडक्ट हल्दीरामच्या एका आउटलेटमध्ये ग्राहकाला देण्यात आलेल्या सांबारमध्ये मृत पालीचं पिल्लू आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरमधील अजनी चौकातील हल्दीरामच्या रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार घडला आहे. ग्राहकानं मेदूवडा ऑर्डर केला होता. मेदूवडासोबत आलेल्या सांबारमध्ये या पालीचं पिल्लू आढळलं.  अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) विभागाच्या एका अधिकाऱ्यानं यासंदर्भातली माहिती दिली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. मेदूवडासोबतच्या सांबारमध्ये मिळालेली मृत पालीच्या पिल्लूचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. 

एफडीए(नागपूर) चे सहाय्यक आयुक्त मिलिंद देशपांडे यांनी सांगितलं की, वर्धाहून यश अग्निहोत्री नावाचं गृहस्थ नागपूरला गेले होते. त्यांच्यासोबत त्यांच कुटुंब देखील होतं. अग्निहोत्री कुटुंब हल्दीराम रेस्टॉरंटमध्ये गेले. त्यांनी त्यांच्या कुटुंबियांनी दोन मेदूवडा सांबारची ऑर्डर दिली. मात्र खाताना अग्निहोत्री यांच्या खाण्यात मृत पालीचं पिल्लू आढळलं. त्यांनी याबाबतची माहिती आउटलेटच्या मॅनेजरला दिली. त्यानंतर रेस्टॉरंटमधील सांबार त्यांनी फेकून दिलं. आयुक्तांनी सांगितलं की, कुटुंबियातील दोघांनी सांबार खाल्ल्यानं त्यांना एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दोघांची प्रकृती स्थिर असल्यानं त्यांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला. 

अग्निहोत्री यांनी याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे (एफडीए) कडे तक्रार दाखल केली आहे. यासोबतच त्यांनी पुरावा म्हणून सांबारचा फोटो आणि त्यांच्या ऑर्डरचं बिल सादर केले. अग्निहोत्री यांच्या तक्रारीनंतर हल्दीरामचं हे आउटलेट बंद करण्यात आलं आहे. आयुक्त देशपांडे यांनी सांगितलं की, एफडीएला संध्याकाळी यासंदर्भातली माहिती देण्यात आली. त्यानंतर एफडीएची टीम तात्काळ हल्दीरामच्या आउटलेटमध्ये गेली आणि निरीक्षण केलं. आम्हांला रेस्टॉरंटच्या स्वयंपाक घरात काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं. स्वयंपाक घरातील जी खिडकी होती त्याला जाळी नव्हती.  देशपांडे यांनी सांगितलं की,  जो पर्यंत हे रेस्टॉरंट अन्न सुरक्षा आणि मानक नियमन २०११ यांचे पालन करत नाही. तोपर्यंत हे आउटलेट बंद करण्यात आलं आहे. 

हल्दीरामच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, आम्हांला ग्राहकानं केलेल्या दाव्यावर संशय आहे. अधिकाऱ्यानं पुढे म्हटलं की, आम्ही त्यांना जवळच्या खासगी रूग्णालयात दाखल केले. त्यांना २४ तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आणि त्यांचे मेडिकल रिपोर्ट नॉर्मल आल्यानं त्यांन रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Nagpur: हल्दीराम रेस्टॉरंटच्या सांबारमध्ये पालीचं पिल्लू, रेस्टॉरंट बंद  Description: Dead lizard found in food at haldiram's outlet: नागपूरमधलं प्रसिद्ध फूड प्रोडक्ट हल्दीराम रेस्टॉरंटमध्ये ग्राहकाला दिलेल्या सांबारमध्ये मृत पालीचं पिल्लू आढळलं. त्यानंतर हे रेस्टॉरंट बंद करण्यात आलं आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
आंबेनळी घाटातील बस अपघात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना मिळणार नोकऱ्या 
आंबेनळी घाटातील बस अपघात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना मिळणार नोकऱ्या 
राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर?
राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर?
राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यानं नाराज मनसे कार्यकर्त्यांनं स्वत: ला पेटवून घेतलं
राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यानं नाराज मनसे कार्यकर्त्यांनं स्वत: ला पेटवून घेतलं
 राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर पहिल्यांदा बोलले उद्धव ठाकरे 
 राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर पहिल्यांदा बोलले उद्धव ठाकरे 
[VIDEO]: पुण्यातील धक्कादायक घटना, रस्त्यावर पार्क केलेल्या कारला दुसऱ्या कारची जोरदार धडक
[VIDEO]: पुण्यातील धक्कादायक घटना, रस्त्यावर पार्क केलेल्या कारला दुसऱ्या कारची जोरदार धडक
 येत्या १० दिवसात भाजपसोबत राहायचे की नाही हे ठरवणार : नारायण राणे 
 येत्या १० दिवसात भाजपसोबत राहायचे की नाही हे ठरवणार : नारायण राणे 
LIVE: ईडीच्या कार्यालयात सलग साडे चार तास राज ठाकरेंची चौकशी
LIVE: ईडीच्या कार्यालयात सलग साडे चार तास राज ठाकरेंची चौकशी
राज ठाकरेंनी काही चुकीच केले नसेल तर घाबरायची गरज नाही : भाजपा मंत्री राम शिंदे 
राज ठाकरेंनी काही चुकीच केले नसेल तर घाबरायची गरज नाही : भाजपा मंत्री राम शिंदे