सूर्यदेव तळपला! विदर्भात उष्णतेची लाट; चंद्रपूरमध्ये जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद

नागपूर
भरत जाधव
Updated Apr 13, 2023 | 21:03 IST

Maharashtra Temperature Today : राज्यात एकीकडे अवकाळी पावसाने (Unseasonal rain) थैमान घातले आहे. तर दुसरीकडे सूर्यदेव (sun) आग ओकतोय. सूर्यदेव इतकी आग ओकतोय की, थेट जगातील सर्वात जास्त तापमानाची (Temperature) नोंद महाराष्ट्रात ( Maharashtra) झाली. तापमानाच्या वाढीमुळे अगदी सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवत आहेत.

Heat wave in Vidarbha; Chandrapur recorded the highest temperature in the world
विदर्भात उष्णतेची लाट; चंद्रपूरमध्ये जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद  |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • येत्या काही दिवसात चंद्रपूरच्या तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता
  • विदर्भ, मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात तापमान चाळीशीच्या मागेपुढे.
  • जगभरात सर्वाधिक तापमानाच्या पहिल्या 15 ठिकाणांमध्ये आठ शहरे भारतातील होती.

Maharashtra Temperature Today : राज्यात एकीकडे अवकाळी पावसाने (Unseasonal rain) थैमान घातले आहे. तर दुसरीकडे सूर्यदेव (sun) आग ओकतोय. सूर्यदेव इतकी आग ओकतोय की, थेट जगातील सर्वात जास्त तापमानाची (Temperature) नोंद महाराष्ट्रात ( Maharashtra) झाली. तापमानाच्या वाढीमुळे अगदी सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील रहदारी कमी झाल्याचे दिसून येत आहे. दुपारीच नव्हे तर रात्री आणि पहाटेही हवेत उकाडा जाणवत आहे. (Heat wave in Vidarbha; Chandrapur recorded the highest temperature in the world)

अधिक वाचा  : आराध्या बच्चन पाहिलं तर म्हणाल, माय तशी लेक
राज्यातील काही भागावर सूर्य कोपला आहे की असं वाटतं आहे. विदर्भ (Vidarbha),मराठवाड्यात (Marathwada) आणि मध्य महाराष्ट्रात तापमान चाळीशीच्या मागेपुढे झुलत होते. उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भ होरपळत आहे. आज विदर्भातील तापमान चाळीसीच्या पुढे राहिले. तर चंद्रपूरमध्ये (Chandrapur)आज 43.2 अंशसेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जगभरात सर्वाधिक तापमानाच्या पहिल्या 15 ठिकाणांमध्ये आठ शहरे भारतातील होती. चंद्रपूर तब्बल 43.2 अंश से. तापमानासह पहिल्या क्रमांकावर होते, त्यानंतर पश्चिम आफ्रिकेतील कोल्डा दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

अधिक वाचा  : जाणून घ्या शुक्रवारचं राशीभविष्य

जगातील सर्वाधिक उष्ण शहरात देशातील आठ शहरांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन शहरे आहेत. वर्धा आणि चंद्रपूर या दोन ठिकाणाचा जगातील सर्वाधिक उष्ण ठिकाणामध्ये सहभाग झाला आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमान 40 अंश  से.हून पुढे गेले आहे. गुरुवारी चंद्रपूर येथे या ऋतूमधील सर्वाधिक 43.2 अंश से. तापमान नोंदले गेले. वर्ध्यामध्ये 42.2 अंश से. तापमानाची नोंद झाली आहे. वर्धा जगातील सर्वात उष्ण शहरामध्ये नवव्या क्रमांकावर आहे. 

अधिक वाचा  : अजितदादांना जाळ्यात अडकवणार आणि भाजप एनसीपीला रडवणार?

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून चंद्रपुरातील तापमानात वाढ होऊ लागली आहे.  गेले दोन दिवस आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश व महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आहे. सलग तीन दिवस चंद्रपूरमधील तापमान 40 पेक्षा जास्त आहे. 11 एप्रिल रोजी चंद्रपूरचे तापमान 41 अंश सेल्सिअस होते, तर  बुधवारी 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. आज हे तापमान 43 पेक्षा जास्त झाले. येत्या काही दिवसात चंद्रपूरच्या तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी