Nagpur Rain : नागपुरात मुसळधार पाऊस, नागरिकांच्या घरात शिरले पाणी,  20 जणांचा मृत्यू

पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे. पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्हे पुरात बुडाले आहेत.  गेल्या अनेक तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उपराजधानी नागपूरमध्येही अशीच परिस्थिती आहे. नागपूरचा अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.

थोडं पण कामाचं
  • पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे.
  • पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्हे पुरात बुडाले आहेत.
  • गेल्या अनेक तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उपराजधानी नागपूरमध्येही अशीच परिस्थिती आहे.

Nagpur Rain : नागपूर : पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे. पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्हे पुरात बुडाले आहेत.  गेल्या अनेक तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उपराजधानी नागपूरमध्येही अशीच परिस्थिती आहे. अंबाझरी नागपूरचा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. संपूर्ण नागपूरला पाणी पुरवठा होणार्‍या गोरेवाडा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत. (heavy rain nagpur 20 people died so far)

या पावसामुळे नागपुरातील नदी नाले आणि तलाव सर्वत्र दुथडी भरून वाहत आहेत. नागपुरातील अनेक पुलांवरून पाणी वाहत आहे. हे पाणीही नागरिकांच्या घरातत शिरले आहे. लोकांची घरे आणि अन्नधान्य, रेशन, सर्व काही पाण्यात गेले आहे.  अगदी घरात पाणी शिरल्याने लोकांना घरे सोडावी लागली आहेत.

नागपूरचे जिल्हा दंडाधिकारी आर विमला यांनी सांगितले की पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन पूर्ण तयार आहे. दरम्यान, नागपुरात या पावसामुळे 20 जणांचा मृत्यू झाला आहे. असे असले तरी अद्याप कोणतेही अधिकृत बचाव कार्य सुरू करण्यात आलेले नाही.

हिंगोली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी