Dilip Walase Patil - मुस्लिम समाजाकडून शांततेत निदर्शने – दिलीप वळसे पाटील

10 जुनला राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाकडून निदर्शनं झाली, मात्र ती शांततेच्या वातावरणात झाली अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

थोडं पण कामाचं
  • 10 जुनला राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाकडून निदर्शनं झाली
  • मात्र ती शांततेच्या वातावरणात झाली
  • अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

Dilip Walase Patil : नागपूर : 10 जुनला राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाकडून निदर्शनं झाली, मात्र ती शांततेच्या वातावरणात झाली अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

आज दिलीप वळसे पाटील नागपुरात आले तेव्हा माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की,  राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाकडून निदर्शनं झाली, ही निदर्शन शांततेत झाली आणि कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. ज्या ज्या ठिकाणी निदर्शकांनी नियमांचे उल्लंघन केले, त्या संदर्भात पोलिसांनी कारवाई केलेली आहे. मात्र त्याचे प्रमाण फार कमी आहे  असेही वळसे पाटील म्हणाले.

वळसे पाटील म्हणाले की, नागपूर तुरुंगात सुधारणा करण्याच्या अनुषंगाने किंवा नवीन तुरूंग निर्माण करण्याच्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत आहोत. तुरुंगात कैद्यांच्या मृत्यूच्या घटना का घडत आहे या संदर्भात आढावा घेऊ असेही पाटील म्हणाले

सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरण

सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात ३-४ राज्यांच्या पोलीस एकत्रित कारवाई करत असल्याचे पाटील म्हणाले. तसेच तपासासंदर्भात सार्वजनिकरित्या बोलू शकत नाही कारण ते संवेदनशील प्रकरण आहे. महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्राचे एटीएस त्यावर लक्ष ठेवून असल्याचेही वळसे पाटील म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी