वर्धा : वर्धा जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक – दोन नव्हे तर तब्बल ७ विध्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या विध्यार्थ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार विजय राहांगडाले यांच्या मुलाचा देखील समावेश आहे. आविष्कार रहांगडाले असं भाजप आमदाराच्या मुलाचे नाव आहे. या अपघातात मृत्यू झालेले ७ विध्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत होते. हे सर्व सावंगी येथील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी होते.
दरम्यान, मिळालेली माहितीनुसार या सर्वांच्या परीक्षा झाल्यामुळे ते आनंदोत्सव साजरा करण्यासाठी पार्टी करायला ते देवळीवरून वर्ध्याला येत असताना हा अचानक चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी सेलसुरा येथील नदीच्या पुलावरून खाली कोसळली. या अपघातात गाडीतील सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार विजय राहांगडाले यांचा एकुलता एक मुलगा अविष्कार राहांगडालेचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर मृतांमध्ये वर्ध्यामधील सेलसुरामधे एक्सयुव्ही कारचा भीषण अपघात झाला आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं कार नदीच्या पुलावरून खाली कोसळली. अपघातात दत्ता मेघे वैद्यकीय रूग्णालयातील सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातातील सर्व मृतक २५ ते ३५ वयोगटातील असल्याची माहिती मिळाली आहे. रात्री एक वाजता जवळपास अपघात झाला असून पहाटे चार वाजेपर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच वर्ध्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, सावंगी पोलिसी निरीक्षकही घटनास्थळी तातडीने दाखल झाले. या अपघातात मृत्यू झालेल्यांमधील सर्व विद्यार्थी हे सावंगी येथील मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आहेत. अपघातात दगावलेल्यांचे मृतदेह वर्धा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
राज्यातील भीषण अपघातांची मालिका सुरू आहे. पुणे-नगर महामार्गावर रविवारी भीषण अपघात झाला होता. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर दुसरीकडे परभणीत ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात तिघा भावंडांचा बळी गेला होता. अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रातील रस्ते अपघात आठ जणांचा बळी गेला. अशातच सोमवारी रात्री आणखी एक भीषण अपघाताची घटना समोर आली असून आता रस्ते अपघातातील बळींचा आकडा आणखी वाढला आहे.