Nagpur Fire : नागपुर : नागपुरमध्ये लकडगंज भागात भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्याच काम सुरू आहे. (huge fire at nagpur lakaganj area video viral)
नागपुरच्या लकडगंज भागात भीषण आग,आगीचे कारण अस्पष्ट#nagur #fire #firebrigade pic.twitter.com/7iY1eYm6iE
— Timesnowmarathi (@timesnowmarathi) April 7, 2022
आज नागपुरच्या लकडगंज भागात आग लागली. ही आग इतकी भीषण होती की आगीचे लोट दूरपर्यंत दिसत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून युध्दपातळीवर आग विझवण्याचे काम सुरू आहे. या भागात लाकडाची दुकाने असून दुकानांमध्ये लाकुड आणि लाकूड कापण्याच्या मशीन्स आहेत. ही आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.