Hunting tiger with shock : महाराष्ट्रात शॉक देऊन केली वाघाची शिकार

Hunting tiger with shock in Maharashtra : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातल्या मोसम गावात शॉक देऊन वाघाची शिकार केल्याचा प्रकार उघड झाला. गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या उच्च दाबाच्या विजेच्या तारांचा वापर करुन शॉक देऊन वाघाची शिकार करण्यात आली.

Hunting tiger with shock in Maharashtra
महाराष्ट्रात शॉक देऊन केली वाघाची शिकार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात शॉक देऊन केली वाघाची शिकार
  • वाघाचा मृतदेह नाल्याकाठी पुरून ठेवला
  • अवयवांची तस्करी करण्यासाठी वाघाची शॉक देऊन शिकार केल्याचे उघड

Hunting tiger with shock in Maharashtra : मोसम : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातल्या मोसम गावात शॉक देऊन वाघाची शिकार केल्याचा प्रकार उघड झाला. गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या उच्च दाबाच्या विजेच्या तारांचा वापर करुन शॉक देऊन वाघाची शिकार करण्यात आली. वाघाचा मृतदेह नाल्याकाठी पुरून ठेवला होता. ही माहिती स्थानिकांनी वन अधिकाऱ्यांना दिली. शिकार करणाऱ्यांचा शोध सुरू आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीआधारे शोध घेताच वन अधिकाऱ्यांना पुरलेले वाघाचे अवयव दिसले. यात वाघाचे डोके आणि पायाचे पंजे दिसत नव्हते. यामुळे टप्प्याटप्प्याने अवयवांची तस्करी करण्यासाठी वाघाची शॉक देऊन शिकार केल्याचे उघड झाले. 

अवयवांची प्राथमिक तपासणी केल्यावर ते किमान आठ दिवसांपासून पुरून ठेवल्याचे लक्षात आले. यामुळे मागच्या आठवड्यात एक किंवा त्यापेक्षा जास्त शिकाऱ्यांनी संयुक्तपणे शॉक देऊन वाघाची शिकार केल्याचे वन अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे. वन अधिकारी स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने शिकाऱ्यांचा शोध घेत असल्याचे समजते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी