Bachchu Kadu: अमरावती: अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी (Ravi Rana) आमदार आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यावर तुफान टीका केली आहे. 'मी काही गुवाहाटीला (Guwahati) जाणारा आमदार नाही.' अशी बोचरी टीका करत रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला आहे. ना बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपय्या... अशी घणाघाती टीका रवी राणा यांनी केली आहे. अमरावतीमधील (Amravati) अचलपूर (Achalpur) येथील एका जाहीर कार्यक्रमात रवी राणा हे बोलत होते. जो बच्चू कडू यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे इथेच रवी राणा यांनी बच्चू कडूंवर निशाणा साधला. (i am not an mla going to guwahati for money ravi rana criticized bachchu kadu)
नेमकी काय टीका केली रवी राणांनी?
'पश्चिम महाराष्ट्रासोबत, विदर्भाचा विकास ज्या नेत्याने केल्या त्याच्यासोबत मी उभा आहे. मी गुवाहटीला जाणारा आमदार नाहीए. ना बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपय्या... हे या मतदारसंघाच्या आमदारचं स्लोगन आहे. काय आहे स्लोगन... ना बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपय्या... रुपये आणायला गुवाहटीला जायला लागते ना...' अशी घणाघाती टीका रवी राणा यांनी केली आहे.
त्यामुळे आता एकाच सरकारला पाठिंबा देणाऱ्या या दोन आमदारांमध्ये आता खडाजंगी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अधिक वाचा: 'मैं झुकेगा नहीं', दिल्लीत नवनीत राणाची पुष्पाची पोज
बच्चू कडू प्रचंड नाराज
उद्धव ठाकरे यांनी जेव्हा महाविकास आघाडी सरकार बनवलं होतं. तेव्हा पहिल्याच विस्तारात त्यांनी आमदार बच्चू कडू यांना राज्यमंत्री पद देऊ केलं होतं. कारण बच्चू कडूंनी २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी देखील त्यांना दिलेला शब्द पूर्ण केला होता. यावेळी शिवसेनेने आपल्या कोट्यातील एक राज्यमंत्री पद हे बच्चू कडूंना दिलं होतं.
अधिक वाचा: शिवसेनेचे ७५ टक्के आमदार शिंदेंसोबत; बच्चू कडूंनी आकडेच सांगितले, ४ दिवसांत स्पष्ट होणार
मात्र, एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेच्या ४० आमदारांसोबत बंड पुकारलं तेव्हा त्यावेळी बच्चू कडू हे देखील सुरुवातीपासून शिंदे गटात गेले. मात्र, जेव्हा एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली त्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांना स्थानच दिलं नाही. राज्यमंत्री असताना देखील बच्चू कडू हे शिंदे गटाच्या बंडात सामील झाले होते. त्यामुळे विस्तारात त्यांना मंत्रिपद मिळेल अशी चर्चा होती. मात्र, शेवटपर्यंत त्यांचं नाव यादीत समाविष्ट करण्यात आलं नाही.
यामुळे बच्चू कडू हे शिंदे गटावर खूपच नाराज आहेत. कारण उद्धव ठाकरेंविरोधात जे बंड करण्यात आलं होतं. त्या बंडाच्या पहिल्या दिवसापासून बच्चू कडू हे शिंदेंसोबत होते. पहिला मंत्रिमंडळ विस्तार ४५ दिवसांनी झाला दुसरा मंत्रिमंडळ विस्तार बहुदा अडीच वर्षानेच होईल असं म्हणत बच्चू कडू यांनी आपली स्पष्ट नाराजी तेव्हा बोलून दाखवली होती.
अधिक वाचा: Bachchu Kadu: 'बच्चू कडूंनी थोडी श्रद्धा आणि सबुरी ठेवावी', दीपक केसरकरांनी दिला सल्ला
'जे सगळ्यात शेवटी आले त्यांना पहिल्या पंगतीला बसवलं. पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार हा ४५ दिवसांनी झाला. दुसरा विस्तार बहुदा अडीच वर्षानेच होईल.' अशी खोचक टिप्पणी करत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.