गडचिरोली : अंतर्गत वादातून राज्य राखीव दलाच्या जवानाने आपल्या सहकाऱ्यावर गोळीबार (gun firing) केल्याची धक्कादायक घटना गडचिरोलीमध्ये (gadchiroli) घडली आहे. सदर घटनेने राज्य राखीव दलात मोठी खळबळ उडाली आहे. माओवाद्यांशी दोन हात करण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या जवानांनी थेट आपल्याचं सहकाऱ्यावर गोळीबार केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अधिक वाचा : पंतप्रधान मोदींनी लागू केली PM Kisan Yojana चा 11वा हफ्ता
मिळालेल्या माहितीनुसार, बंडु नवतरला आणि श्रीकांत बेरड अशी सदर घटनेत मृत पावलेल्या जवानांची नावे आहेत. पुण्याहून हे जवान गडचिरोलीमध्ये तैनात झाले होते. अतिदुर्गम अतिसंवेदनशील मरपल्ली पोलीस ठाण्यात बॅरकमध्ये ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दोन्ही जवानांचे मृतदेह ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. या घटनेमुळे राज्य राखीव दलात खळबळ उडाली आहे.
अधिक वाचा ; लॉर्ड्स कसोटीकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, हे आहे प्रमुख कारण
श्रीकांत बेरड आणि बंडु नवतरला यांच्यामध्ये अंतर्गत वादातून भांडण झाले होते. त्यामुळे रागाच्या भरात रायफलमधून श्रीकांत बेरड याने बंडू नवतरला यांच्यावर गोळी झाडली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. बंडू नवतरला याचा आपल्या झाडलेल्या गोळीतून मृत्यू झाला हे लक्षात येताच त्यानंतर श्रीकांत यांनी स्वत:च्या बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केली. राज्य राखीव दलाच्या जवानामध्ये अंतर्गत वादातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोघेही दौंड पुणे येथील SRPf कॅम्पचे जवान होते.
अधिक वाचा : Team India:आधी लग्नात फसवणूक, नंतर संघातून बाहेर, आता...