महाराष्ट्रात या शहरात पेट्रोल 117.56 तर डिझेल 100.23 रुपये लिटर..

विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील बुलढाणा जिल्ह्यात पेट्रोल 117.56 रुपये लिटर वर पोहोचले आहे. तर डिझेल 100.23 रुपये लिटर दराने विकले जात आहे.

In Buldhana, petrol is Rs 117.56 and diesel is Rs 100.23 per liter.
या शहरात पेट्रोल 117.56 तर डिझेल 100.23 रुपये लिटर.. 
थोडं पण कामाचं
 • मार्चमध्ये 9 वेळा दरवाढ झाल्याने पेट्रोल 5.79 तर डिझेल 5.74 रुपयाने महागले
 • सर्वसामान्यांना इंधन दरवाढीचा फटका
 • विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील बुलढाणा जिल्ह्यात पेट्रोल 117.56 रुपये लिटर वर पोहोचले आहे. तर डिझेल 100.23 रुपये लिटर दराने विकले जात आहे.

बुलढाणा : विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील बुलढाणा जिल्ह्यात पेट्रोल 117.56 रुपये लिटर वर पोहोचले आहे. तर डिझेल 100.23 रुपये लिटर दराने विकले जात आहे. इंधनाच्या या वाढलेल्या दरामुळे बुलडानेकर याचा चांगलाच फटका बसला आहे... त्यामुळे अनेक जणांनी उपहासात्मक केंद्र सरकारचे या वाढलेल्या पेट्रोल डिझेल दरवाढी बद्दल धन्यवाद केले आहे.. 

देशात इंधनदरवाढीचं सत्र सुरुच असून आज पुन्हा एकदा इंधनदर कडाडल्याचं पाहायला मिळालं आहे. आज पेट्रोलचे दर 84 पैसे प्रति लिटर आणि डिझेल 83 पैसे प्रति लिटरने वाढले आहेत. आता बुलडाणा जिल्ह्यात एक लिटर पेट्रोलची किंमत 117.56 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 100.23 रुपये झाली आहे...

महाराष्ट्रात बुलढाण्यातही पेट्रोल-डिझेल दरवाढ सुरु असल्याचं पाहायला मिळालं. आज बुलढाण्यात पेट्रोल 84 पैशांनी महागलं तर डिझेल 83 पैशांनी वाढले आहे. त्यामुळे  पेट्रोलचे दर 117 रुपये 56 पैशांवर तर डिझेल गेले 100 रुपये 23 पैशांवर पोहोचलं आहे. यंदाच्या वर्षात  1 मार्च नंतर पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये 9 वेळा वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.

या दरम्यान पेट्रोलच्या दरात 5.79 रुपये आणि डिझेलच्या दरात 5.74 रुपये प्रति लिटर वाढ झाली आहे..इंधनाच्या या वाढलेल्या दरामुळे बुलडानेकर चांगलेच त्रस्त झालेत. त्यामुळे अनेक जणांनी केंद्र सरकारचे या वाढलेल्या पेट्रोल डिझेल दरवाढी बद्दल धन्यवाद केले आहे.. 

अशी झाली दरवाढ 

 1. 1 मार्च :  पेट्रोल 111.77 रुपये,डिझेल 94.49 रुपये..
 2. 22 मार्च :  पेट्रोल 112.61 रुपये, डिझेल 95.32 रुपये..
 3. 23 मार्च : पेट्रोल 113.45 रुपये, डिझेल 96.15 रुपये..
 4. 25 मार्च : पेट्रोल 114.28 रुपये,डिझेल 96.98 रुपये..
 5. 26 मार्च : पेट्रोल 115.05 रुपये,डिझेल 97.74 रुपये..
 6. 27 मार्च: पेट्रोल115.57 रुपये,डिझेल 98.31 रुपये..
 7. 28 मार्च : पेट्रोल 115.89 रुपये, डिझेल 98.67 रुपये..
 8. 29 मार्च : पेट्रोल 116.72 रुपये,डिझेल 99.40 रुपये..
 9. 30 मार्च : पेट्रोल 117.56 रुपये,डिझेल 100.23 रुपये

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी