महाराष्ट्र हादरलं ! डॉक्टरवर गोळीबार, ३ पाठीत तर १ गोळी झाडली छातीवर

In Yavatmal, two youths opened fire on a doctor : रुग्णालयाच्या समोरच डॉक्टर धर्मकारे यांच्यावर गोळीबार करण्यात आला.  धर्मकारे यांच्यावर गोळीबार होताच मोठा गोंधळ उडाला होता. ​​गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे

In Yavatmal, two youths opened fire on a doctor
महाराष्ट्र हादरलं ! डॉक्टरवर गोळीबार, ३ पाठीत तर १ गोळी झाडली छातीवर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • यवतमाळमधील जिल्ह्यातील एका डॉक्टरवरती गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे
  • रुग्णालयाच्या समोरच डॉक्टर धर्मकारे यांच्यावर गोळीबार करण्यात आला
  • ​गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले.

Yavatmal Crime news in marathi  । यवतमाळ : ​यवतमाळमधील जिल्ह्यातील एका डॉक्टरवरती गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना यवतमाळ जिल्ह्याती उमरखेड येथील उत्तरवार रुग्णालयाच्या (Uttarwar Hospital in Yavatmal) परिसरात आज संध्याकाळी ही घटना घडली आहे. हल्ला झालेल्या  डॉक्टराचं नाव हनुमंत धर्मकारे आहे. या गोळीबारामुळे डॉक्टर धर्मकारे हे जखमी झाले आहे, त्यांना याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यात आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेत डॉक्टरांनी केलेले काम आपण कधीच विसरू शकत नाहीत. दरम्यान, राज्यात पुन्हा एका कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असून, या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. डॉक्टर, आरोग्य सेवक पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. मात्र, दुसरीकडे यवतमाळमध्ये (Yavatmal) एका रुग्णालयात डॉक्टरावर (doctor) गोळीबाराची  (gun fire) घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

​गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , रुग्णालयाच्या परिसरात आले असता अचानक दोन तरुण दुचाकीवर आले आणि त्यांनी धर्मकारे यांच्यावर बेछुट गोळीबार केला. ​हनुमंत धर्मकारे हे दुपारी रुग्णालयातून घरी निघाले होते. मात्र,  रुग्णालयाच्या समोरच डॉक्टर धर्मकारे यांच्यावर गोळीबार करण्यात आला.  धर्मकारे यांच्यावर गोळीबार होताच मोठा गोंधळ उडाला होता. ​​गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. ​या प्रकरणी दोन अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  घटनेची  माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. डॉक्टर धर्मकारे यांच्यावर का आणि कशासाठी गोळीबार केला, याचा तपास पोलीस करत आहे. ​हल्लेखोरांना पकडण्यासाठी शहरात नाकाबंदी करण्यात आली असून, पोलीस हल्लेखोराना लवकर ताब्यात घेतील असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

किराणा दुकानात विक्रीसाठी ठेवल्या थेट तलवारी अन् सुऱ्या

पोलिसांनी गुप्त खबऱ्याद्वारे एका किराणा दुकानात धाड टाकली असता त्यांना त्या ठिकाणी घातक शस्त्र तलवारी व सुरे तसेच महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा , देशी विदेशी दारू, तसेच तीन तलवारी व एक मोठा सुरा असा मुद्देमाल सापडला आहे. पोलिसांनी सदर मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या या मुद्देमालाची एकूण ४५ हजार ४८० रुपये किंमत आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने ग्राम तिकोडी येथे असणाऱ्या राजू बडे याच्या जगदंबा किराणा दुकान व घरामध्ये धाड टाकली होती. दरम्यान , पोलिसांनी यावेळी एकाला अटक देखील केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे राजू बडे असं आहे. पोलिसांनी राजू बडे  याच्याविरुद्ध नांदुरा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.

 

संग्रामपूर , जळगाव जामोद परिसरात अवैध शस्त्र विक्रीचं हब बनत चाललं आहे

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढत असल्याचं समोर येत आहे. त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर , जळगाव जामोद परिसरात अवैध शस्त्र विक्रीचं हब बनत चाललं असल्याच्या अनेक तक्रारी देखील प्राप्त समोर आल्या आहेत. मात्र पोलिसांची मोठी कारवाई होत नसल्याने व या अवैध शस्त्र तयार करणे व विकणाऱ्या व्यवसायाला लगाम लागत नाही. यामुळं परिसरात दहशत मात्र वाढत असल्याचं नागरिकांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात अलीकडच्या काळात अवैध शस्त्र बनविणे , विक्री करणे अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. झारखंड दहशतवाद विरोधी पथकाने तर जिल्ह्यात येऊन कारवाई करत काही गावठी पिस्तुल व शस्त्र जप्त करून तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी