महाराष्ट्र: अमरावतीमध्ये इंटरनेट सेवा पूर्ववत, संचारबंदी कायम

Internet services restored in Amravati महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात बंद केलेली इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. राज्य शासनाने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद केली होती. अमरावतीच्या अनेक भागांमध्ये संचारबंदी अद्याप आहे.

Internet services restored in Amravati
महाराष्ट्र: अमरावतीमध्ये इंटरनेट सेवा पूर्ववत, संचारबंदी कायम 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्र: अमरावतीमध्ये इंटरनेट सेवा पूर्ववत, संचारबंदी कायम
  • अमरावतीच्या अनेक भागांमध्ये संचारबंदी अद्याप आहे
  • अमरावती जिल्ह्यात सहा दिवसांनंतर इंटरनेट सेवा पूर्ववत

Internet services restored in Amravati : अमरावती:  महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात बंद केलेली इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. राज्य शासनाने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद केली होती. अमरावतीच्या अनेक भागांमध्ये संचारबंदी अद्याप आहे.

त्रिपुरामध्ये मशिदीची तोडफोड झाल्याची खोटी बातमी महाराष्ट्रात सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविण्यात आली. यानंतर अमरावती, नांदेड, मालेगाव येथे अल्पसंख्यांक समाजाने निषेध मोर्चे काढले. निषेधासाठी बंद पुकारण्यात आला. बंद दरम्यान मोठ्या प्रमाणावर हिंसा, जाळपोळ तसेच सार्वजनिक आणि खासगी संपत्तीची नासधूस करण्यात आली. हिंसक घटना वाढू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने अमरावती जिल्ह्यात संचारबंदी लागू केली. अफवा पसरू नये यासाठी महाराष्ट्र शासनाने अमरावती जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद केली. परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे आज (शुक्रवार १९ नोव्हेंबर २०२१) अमरावतीमध्ये इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली. पण खबरदारीचा उपाय म्हणून अमरावतीच्या अनेक भागांमध्ये संचारबंदी अद्याप ठेवली आहे.

अमरावती जिल्ह्यात सहा दिवसांनंतर इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली. या दरम्यान कायद्याचे पालन करणाऱ्या, वर्क फ्रॉम होम करणाऱ्या आणि ऑनलाइन शिक्षण घेत असलेल्यांना इंटरनेट अभावी अडचणींना सामोरे जावे लागले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी