भाजप राज्यपाल कोश्यारींना पाठिशी घालतंय का?

नागपूर
रोहित गोळे
Updated Nov 22, 2022 | 16:53 IST

BJP and Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतरही भाजप त्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.

is bjp defending governor bhagat singh koshyari
भाजप राज्यपाल कोश्यारींना पाठिशी घालतंय का? 
थोडं पण कामाचं
  • राज्यपाल कोश्यारींना महाराष्ट्रातून हटविण्याची मागणी
  • राज्यपाल कोश्यारींवर भाजप कारवाई करणार?
  • भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी केली कोश्यारींची पाठराखण

Bhagat Singh Koshyari: नागपूर: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सध्या महाराष्ट्रात बराच वाद सुरु आहे. राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावरुन विरोधकांनी बराच गदारोळ केला आहे. (is bjp defending governor bhagat singh koshyari) 

अनेकांनी राज्यपाल कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन हटविण्याची देखील मागणी केली आहे. मात्र, असं असलं तरीही या सगळ्या प्रकरणात भाजप नेते हे अतिशय सावधपणे प्रतिक्रिया देत राज्यपालांचं वक्तव्य चुकीचं नसल्याचं म्हणत असल्याचे दिसत आहे. यामुळेच राज्यपाल कोश्यारी यांना भाजप पाठिशी घालत आहे का? असा सवाल विरोधक विचारत आहेत. 

अधिक वाचा: Sanjay Raut: 'सरकार 100 टक्के पडणार, माझ्याकडे सगळी माहिती', राऊतांचा गौप्यस्फोट

खरं विरोधकांच्या या प्रश्नाचं उत्तर काही प्रमाणात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतूनच आपल्याला पाहायला मिळेल. पाहा राज्यपाल कोश्यारींविषयी चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले.

आता बावनकुळे यांचं हे म्हणणं ऐकल्यानंतर आपल्याला देखील समजून येईल की, या संपूर्ण प्रकरणात पक्ष म्हणून भाजपची नेमकी काय भूमिका आहे.

अधिक वाचा: Girish Mahajan : एकनाथ खडसे यांच्या मुलाने आत्महत्या केली की खून झाला? गिरीश महाजनांच्या वक्तव्यामुळे वाद

खरं तर आतापर्यंत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अनेकदा वादग्रस्त विधानं केली आहेत. मात्र, तरीही वारंवार भाजप नेते त्यांची पाठराखण करत असल्याचं दिसून आलंय. पण तरीही केंद्रातून त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाल्याचं अद्याप दिसून आलेलं नाही. त्यामुळेच आता जेव्हा राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य केलं तेव्हा मात्र विरोधक प्रचंड आक्रमक झाले असून त्यांनी कोश्यारींवर कारवाईची मागणी केली आहे. 

अशावेळी भाजप कोश्यारींना राज्यपाल पदांवरुन हटवणार की नेहमी प्रमाणेच त्यांना पाठिशी घालणार का? असा सवाल विरोधक विचारत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी