Video : 'जैश'च्या दहशतवाद्यांनी केली संघ मुख्यालयाची 'रेकी'; पोलीस बंदोबस्तात वाढ

Jaish-e-Mohammed terrorists conduct recce of RSS headquarters :   जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून नागपूर येथील काही संवेदनशील ठिकाणांची रेकी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Jaish-e-Mohammed terrorists conduct recce of RSS headquarters, Hedgewar Bhavan in Nagpur, security tightened
दहशतवादी संघटनेकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिसराची   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन तिथे सुरक्षा व्यवस्था मजबूत केली आहे
  • जम्मू-काश्मीरमध्ये तरुणाला अटक झाल्यानंतर सेंट्रल एजन्सीला त्याने नागपुरात ही रेकी केल्याची माहिती दिली
  • धक्कादायक म्हणजे पाकिस्तानमधील काहींच्या सांगण्यावरूनच जम्मू-काश्मीरमधील तरुणाने नागपुरात रेकी केल्याची धक्कादायक  माहिती

Jaish-e-Mohammed terrorists conduct recce of RSS headquarters, Hedgewar Bhavan in Nagpur, security tightened : नागपूर :  जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून नागपूर येथील काही संवेदनशील ठिकाणांची रेकी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, सदर माहिती समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही या वृत्तास दुजोरा दिला असून, पोलीस याबाबतीत सतर्क झाले असून, सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 

संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन तिथे सुरक्षा व्यवस्था मजबूत केली आहे

पोलिसांना सदर घटनेची माहिती ही सेंट्रल एजन्सीकडून मिळाली असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, पोलिसांना माहिती मिळताच त्यानी या माहितीची दखल घेत शहरातील काही महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे. नागपुर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाल परिसरातील मुख्यालय, रेशीम बागमधील संघाचा डॉ हेडगेवार स्मृती मंदिर परिसर आणि इतर काही संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन तिथे सुरक्षा व्यवस्था मजबूत केली आहे. पोलीस आयुक्तांनी नागपुरातील कोणत्या ठिकाणांची रेकी करण्यात आली याची माहिती दिली नाही. मात्र, या प्रकरणी युएपीए कायद्याअंतर्गत एक गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये तरुणाला अटक झाल्यानंतर सेंट्रल एजन्सीला त्याने नागपुरात ही रेकी केल्याची माहिती दिली

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील एका तरुणाला नुकतच जम्मू-काश्मीरमध्ये अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर सदर तरुणाने जुलै महिन्यात नागपुरात दोन दिवस वास्तव्य करून काही स्थानांची रेकी केल्याची माहिती सेंट्रल एजन्सीला दिली आहे. सेंट्रल एजन्सीने त्यानंतर सर्व माहिती नागपूर पोलिसांना  देण्यात आली.  धक्कादायक म्हणजे पाकिस्तानमधील काहींच्या सांगण्यावरूनच जम्मू-काश्मीरमधील तरुणाने नागपुरात रेकी केल्याची धक्कादायक  माहिती समोर आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी