पाकिस्तानचा पुन्हा भ्याड हल्ला, महाराष्ट्रातील जवानाला वीरमरण 

Jawan Sangram Shivaji Patil lost life in ceasefire violation by Pakistan: पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील जवान संग्राम शिवाजी पाटील हे शहीद झाले आहेत.

Jawan Sangram Shivaji Patil lost life in ceasefire violation by Pakistan
शहीद संग्राम शिवाजी पाटील  |  फोटो सौजन्य: ANI

कोल्हापूर : पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रंधीचं उल्लंघन (ceasefire violation by Pakistan) केलं आहे. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात (Rajouri district) शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानने भारतीय गोळीबार केला. या गोळीबारात भारतीय सैन्य दलातील एका जवानाला वीरमरण आले आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur district) संग्राम शिवाजी पाटील (Sangram Shivaji Patil) हे शहीद झाले आहेत. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय सैन्याने (Indian Army) प्रत्युत्तर दिलं आहे.

संग्राम शिवाजी पाटील हे भारतीय सैन्य दलात १६ मराठा बटालियनमध्ये हवालदार पदावर कार्यरत होते. संग्राम हे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यामधील निगवे खालसा गावातील निवासी होते. संग्राम शिवाजी पाटील यांना वीरमरण आल्याचं वृत्त कळताच संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

भारतीय सैन्यदलाने सांगितले की, "हवालदार संग्राम शिवाजी पाटील हे एक कर्तृत्ववान, शूर आणि प्रामाणिक सैनिक होते. त्यांच्या सर्वोच्च त्याग आणि कर्तव्याप्रती संपूर्ण देश नेहमीच त्यांचा ऋणी राहील."

अधिकाऱ्यांनी सांगितले की, नौौशेरा सेक्टरमधील लाम परिसरात रात्री एक वाजण्याच्या सुमारास पाकिस्ताने गोळीबार केला. या गोळीबारात संग्राम हे जखमी झाले होते आणि उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. पाकिस्तानने केलेल्या या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं. दोन्ही बाजूंने काही काळ गोळीबार सुरू होता. 

ऐन दिवाळीत पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात राज्यातील दोन जवानांना वीरमरण 

ऐन दिवाळीमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात कोल्हापूर जिल्ह्यातील ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण आले. दिवाळीत पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात भारतीय सैन्य दलाचे तीन जवान शहीद झाले होते. त्यापैकी दोन जवान हे महाराष्ट्राचे होते. ऋषिकेश रामचंद्र जोंधळे हे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात असलेल्या बहिरेवाडी गावचे निवासी होते ते अवघ्या २० वर्षांचे होते. तर नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील भूषण सतई यांनाही वीरमरण आले होते. शहीद भूषण सतई हे सहा मराठा बटालियनमध्ये नायक पदावर कार्यरत होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी