बुलढाणा : आपण आपल्या घरात लहान मुले असल्यानंतर पाहतो की, या लहान मुलांना मोबाईलचे मोठे वेद लागले आहे. अगदी जेवताना आणि झोपताना आपण या लहान मुलांना जर मोबाईल दिला नाहीत तर मुलं झोपत देखील नाहीत. आता या लहान मुलांबरोबर मांजरांनाही मोबाईलचा लळा लागला असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर, ही मांजराची पिल्ले युट्यूब वरती कार्टून पाहिल्याशिवाय पिले झोपतच नाहीत. त्यामुळे या मांजराच्या पिल्लांना पहायला गर्दी देखील होत आहे.
अधिक वाचा : मॉलच्या फूड कोर्टमध्ये गोळीबार, 4 लोकांचा मृत्यू; अनेक जखमी
मोठ्यांप्रमाणे अगदी लहान मुलांनाही मोबाईल पाहण्याचे एक प्रकारे व्यसन लागल्याचे अनेकदा आपण पाहत आहोत. परंतु आता हेच व्यसन जर मांजरांच्या पिल्लांना लागले असेल तर हे तुम्हाला पटणार नाही. मात्र हे खर आहे. बुलढाणा जिल्ह्यतील खामगाव येथील मांजरीनीचे पिल्ले टायगर आणि छोटीला कार्टून पाहण्याचा छंद लागला आहे. या पिल्लांना मोबाईल वरती सतत कार्टून लावून द्यावे लागते. नाहीतर हे पिल्ले मोठ्या प्रमाणात कालवा करतात. दरम्यान, अन्न, वस्त्र, निवारा ह्या मानवाच्या तीन मूलभूत गरजा आहेत. मात्र अलीकडच्या काळामध्ये या गराजांमध्ये अजून एका बाबीचा म्हणजेच मोबाईलचा समावेश झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. मोबाईल देखील आता जीवनावश्यक वस्तू बनलेला आहे. आणि याच मोबाईलचे व्यसन मांजरीनीच्या पिल्लांना लागल्याचे पाहायला मिळाल्याने मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अधिक वाचा : राज्यात अतिवृष्टीचा तडाखा; मुसळधार पावसानं घेतले 104 जणांचे
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील नाना हिवराळे यांच्याकडे दोन मांजरीचे पिल्ले आहेत. या पिल्लांचे नाव टायगर आणि छोटी असं आहे. या दोन्ही ही पिल्लांना मोबाईलवर कार्टून पाहिल्याशिवाय चैन पडत नाही, आणि जोपर्यंत हे पिल्ले कार्टून पाहत नाहीत तोपर्यंत झोपतही नाहीत. हे दोन्ही पिल्ले अगदी एकाग्रचित्त करून मोबाईल मध्ये कार्टून पाहतात. बरं एवढंच नाही, तर त्यांना माणसाची सर्व भाषा देखील समाजत असल्याचे नाना हिवराळे सांगतात. हे पिल्ल यांच्याबरोबर कविताही त्यांच्या भाषेत म्हणताना दिसतात. या पिल्लांचा व्हिडीओ देखील सोशल मिडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे.
अधिक वाचा ;' महाराष्ट्रात मविआ सरकारच्या काळात २२ हजार ७५१ बालमृत्यू