Maharashtra Assembly Winter Session : महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा ; आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेत 'या' आजारांचाही समावेश!

MJPJAY अंतर्गत 971 प्रकारच्या शस्त्रक्रिया, थेरपी आणि वैद्यकीय प्रक्रियांचा समावेश आहे. आता अस्थिव्यंग, गतिमंद, न्यूरोजीकल रुग्णांवरील उपचारांचा समाविष्ट करण्याबाबत महाराष्ट्र सरकार सकारात्मक विचार करणार असल्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले.

Maharashtra Assembly Winter Session: Maharashtra Government's Big Announcement; Now Mahatma Phule Jan Arogya Yojana also includes 'these' diseases!
Maharashtra Assembly Winter Session : महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा ; आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेत 'या' आजारांचाही समावेश!   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक आरोग्य विमा योजना
  • 971 प्रकारच्या शस्त्रक्रिया, थेरपी आणि वैद्यकीय प्रक्रियांचा समावेश
  • बीपीएल आणि एपीएल कुटुंबांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातात

नागपूर : राज्यातील लाखो रुग्णांना दिलासा देणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आता आणखी आजार उपचारांचा समावेश होण्याची शक्यता आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत आरोग्य खात्याच्या संदर्भात उत्तर देताना आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी उत्तर दिले. अस्थिव्यंग, गतिमंद, न्यूरोजीकल रुग्णांवरील उपचारांचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करणार असल्याचे यांनी सांगितले. (Maharashtra Assembly Winter Session: Maharashtra Government's Big Announcement; Now Mahatma Phule Jan Arogya Yojana also includes 'these' diseases!)

अधिक वाचा : Gram Panchayat Election: मुंडे भाऊ-बहिणीने करून दाखवलं! एकत्र पॅनल लढवत ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवलं

नागपूर अधिवेशनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आरोग्य विभागाच्या प्रश्न उपस्थित केला. ऑटीझम (स्वमग्नता) हा आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. स्वमग्न मुलांना सगळ्या थेरपी एकत्र मिळण्याची आवश्यकता असते. ऑटीझम रुग्णांना जिल्हा पातळीवर तातडीनं निदान आणि उपचार मिळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक ऑटीझम सेंटर सुरु करावं. शहरी भागात काही प्रमाणात यावर उपचार मिळत आहेत, मात्र ग्रामीण भागात या आजारांवर उपचार मिळत नाहीत. या आजाराचं लवकर निदान झालं तर त्यावर उपचार करणं सोपं जातं. त्यासाठी प्रत्येक जिल्हा पातळीवर ऑटीझम सेंटरची निर्मिती करण्यात यावी. महाविकास आघाडी सरकार असताना प्रत्येक जिल्ह्यात ऑटीझम सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रत्येक जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी अशी सेंटर झाली तर लवकर ऑटीझमग्रस्त मुलांवर तातडीनं उपचार होतील, अशी मागणी करत सरकराचे लक्ष वेधले.

अधिक वाचा : Maharashtra Gram Panchayat Election Results 2022: Full List of Sarpanch Winners seat wise : जाणून घ्या; कोण बनला तुमच्या गावचा सरपंच

राज्यात स्वमग्नता, गतिमंद, न्यूरोजीकल आजारी मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या देशभरात 0.1 टक्के मुले या आजारांनी त्रस्त आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार प्रत्येक 160 मुलांमागे एक मुलाला हा आजार आहे. यावरील चर्चेत माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील जिल्हास्तरीय केंद्र उभारणीस बराच वेळ लागेल तोपर्यंत राज्य शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत या उपचारांचा समावेश करावा अशी मागणी केली.

त्याला उत्तर देत असताना आरोग्यमंत्री सावंत यांनी यांनी जिल्हा निहाय उपचार केंद्र सुरू करण्यासोबतच या रुग्णांवरील उपचारांचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समावेश करण्यात येईल असे आश्वासन सभागृहाला दिले. आत्ममग्नता आजाराने बाधित असलेल्या गरीब कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाते का, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर या मुलांना शैक्षणिक आरक्षण दिले जात असल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी