लवकरच सत्तेची कोंडी फुटणार? मुख्यमंत्र्यांनी घेतली RSS प्रमुखांची भेट

नागपूर
पूजा विचारे
Updated Nov 06, 2019 | 08:36 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेतली. या बैठकीत राज्याच्या सत्तास्थापनेबाबत काही महत्त्वाचा निर्णय झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Cm meet rss head
लवकरच सत्तेची कोंडी फुटणार? मुख्यमंत्र्यांनी घेतली RSS प्रमुखांची भेट  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • राज्यात सुरू असलेल्या सत्ता स्थापनेचा पेच काही केल्या सुटताना दिसत नाही आहे.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेतली.
  • या बैठकीत राज्याच्या सत्तास्थापनेबाबत काही महत्त्वाचा निर्णय झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकीकडे राज्यात सुरू असलेल्या सत्ता स्थापनेचा पेच काही केल्या सुटताना दिसत नाही आहे. त्यातच दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेतली. या बैठकीत राज्याच्या सत्तास्थापनेबाबत काही महत्त्वाचा निर्णय झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, चर्चेत सरसंघचालकांनी युती कायम राहावी, असं मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचं समजतंय. 

शिवसेना आणि भाजपमधला वाद आता चांगलाच पेटला आहे. सत्तेचा हा वाद सरसंघचालकांच्या दारात पोहोचला. मुख्यमंत्र्यांनी अत्यंय गोपनीयपणे भागवतांची भेट घेतली. दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. जवळपास दीड  तास ही चर्चा झाली. यावेळी त्यांच्यासोबत भैय्याजी जोशीही सोबत होते. मुख्यमंत्र्यांच्या दिवसभराच्या कार्यक्रमपत्रिकेत या भेटीचा कोणताही उल्लेख नव्हता. तसंच या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसी बोलणंही टाळलं. या बैठकीनंतर मुख्यमंत्री थेट मुंबईकडे रवाना झाले. 

सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सत्तास्थापनेसाठी हालचाली जोरात सुरू केल्यात. मंगळवारी मुंबईत भाजप नेत्यांची बैठक आटोपल्यावर मुख्यमंत्री रात्री 9 वाजता नागपुरात आले होते. मुंबईत भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यात आला. बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच महायुतीचं सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. शिवसेनेनं प्रस्ताव द्यावा. चर्चेसाठी आमचे दरवाजे 24 तास उघडे असल्याचंही पाटील यांनी सांगितलं आहे. 

शिवसेना मुख्यमंत्रीपदासह 50-50 च्या आपल्या फॉर्म्युल्यावर ठाम आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन 12 दिवस उलटले तरीही राज्यातील सत्तास्थापनेची कोंडी फुटू शकलेली नाही. शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्यास भाजपनं तयार नाही. त्यातच राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार येणार, असे भाजप नेते सांगताना दिसतायत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी