Maharashtra MLC Election Result : विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी; मित्र करणार दोस्ताचा गेम, तर काय असेल नागपूरचं चित्र?

नागपूर
भरत जाधव
Updated Dec 14, 2021 | 09:20 IST

Vidhan Parishad Election Result : महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad Election Result) नागपूर (Nagpur) आणि अकोला (Akola) वाशिम (Washim) बुलडाणा (Buldana) स्थानिक स्वराज संस्था (Local Self Government Institutions) मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी (votes Counting ) होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 10 डिसेंबरला मतदानाची (Voting) प्रक्रिया पार पडली होती.

Maharashtra MLC Election Result :
विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 10 डिसेंबरला मतदानाची (Voting) प्रक्रिया पार पडली होती.
  • सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात
  • निवडणूक आयोगाने 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता त्यापैकी चार जागा बिनविरोध पार पडल्या

Vidhan Parishad Election Result : अकोला : महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad Election Result) नागपूर (Nagpur) आणि अकोला (Akola) वाशिम (Washim) बुलडाणा (Buldana) स्थानिक स्वराज संस्था (Local Self Government Institutions) मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी (votes Counting ) होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 10 डिसेंबरला मतदानाची (Voting) प्रक्रिया पार पडली होती. नेमकं या मतदान पेटित कोणाचं भाग्य दडलं आहे, याकडे आता सर्वांचं लक्ष लागून होतं. आज अखेर यासाठी मतमोजणी होणार आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात झाली आहे. 

दरम्यान, निवडणूक आयोगाने 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता त्यापैकी चार जागा बिनविरोध पार पडल्या तर नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक लागली. अकोला-वाशिम-बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) आणि भाजपचे वसंत खंडेलवाल (Vasant Khandelwal) यांच्यात चुरशीची लढत झाली. तर नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना उमेदवारी देण्यात आली होती. आणि काँग्रेसवर ऐनवेळी उमदेवार बदलण्याची नामुष्की आली होती.छोटू भोयर यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांना काँग्रेसनं पाठिंबा दिला होता. 

विधान परिषद निवडणूकीसाठी अकोला, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील 22 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले होते. तिन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य असलेल्या 822 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार होते. मात्र, या 822 मतदारांपैकी 808 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे.  

हॅटट्रिक होणार का ?

अकोला-वाशिम-बुलडाणा मतदारसंघातील लढत एका घट्ट मित्रांमध्ये आहे. भाजपचे वसंत खनडेलवाल आणि महाविकास आगाडीचे गोपिकीशन बाजोरिया या दोन मित्रांमध्ये ही लढत आहे. हा विधानपरिषदेचा गुलाल नेमका आता कोणाच्या खांद्यावर उधळतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यावेळी बाजोरिया निवडून आले तर बाजोरीयांची चौथ्यादार हॅटट्रिक होईल, जर बाजोरिया यांचा पराभव होऊन वसंत खंडेलवाल यांचा विजय झाला तर पाहिल्यांदार विधान परिषदमध्ये कमळ फुलेल. 

नागपूरमध्ये भाजपच्या विजयाची शक्यता?

नागपूरच्या जागेवर भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी दिली. तर भाजपमधून आलेले नगरसेवक डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना काँग्रेसकडून तिकीट देण्यात आले होते. काँग्रेसने थेट पक्षाचा नगरसेवक फोडून त्यांना उमेदवारी दिल्याने भाजपने आपले नगरसेवक सहलीवर पाठवले. मतदान फुटू नये, म्हणून भाजपकून सतर्कता बाळगण्यात आली होती. मात्र, मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पत्रक काढत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. या घटनेमुळे नागपूर विधान परिषद मतदारसंघात सध्या तरी भाजपचे पारडे जड दिसत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी