Tigers killed in Navegaon Nagzira Tiger Reserve at Maharashtra: भारतात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात होती मात्र, गेल्या काही वर्षांत भारतातील वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. वाघांची कमी होणारी संख्या लक्षात घेता शासनाने ठोस पावलं उचलत व्याघ्र संवर्धन करण्याचा निर्णय घेतला. विदर्भातील अभयारण्याच्या वाढत्या संख्येने त्यामुळेच नागपूरला 'टायगर कॅपिटल ऑफ इंडिया' म्हटले जाते. मात्र, याच विदर्भातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विदर्भातील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात पसरलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात एका वर्षात पाच वाघांची शिकार झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वर्षभरात तीन ते चार वाघांची शिकार झाली असून काही वाघ गायब असल्याची कुजबुज स्थानकांमध्ये सुरू आहे. 26 मार्च 2023 रोजी नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील कोका जंगलात खुर्शिपार गावालगत जंगलातील नाल्यात अत्यंत बलशाली आणि सदर व्याघ्र प्रकल्पातील सर्वात मोठा, दमदार असा वाघ (T-13) याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे स्थानिक सांगतात.
हे पण वाचा : हे उपाय करा अन् डास चावल्यावर येणारी खाज पळवा
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार येथील प्रशासनाच्या उदासीन आहे, खास करुन DFO (व्याघ्र प्रकल्प NNTR साकोली) यांच्या कार्यक्षेत्रात मोठीव हलगर्जी दाखवण्यात येत आहे. या वाघाची दोन ते तीन दिवसआधी शिकार करण्यात आली आणि त्यात त्याचे नखे, दात आणि मिशा काढण्यात आल्याचं समोर आलं. या आधी तीन महीने अत्यंत दूर्मिळ असणारा काळा बिबळ्या ( Black panther)ज्याला लोक "भगीरा" म्हणत आणि खास पर्यटक येत असत, त्याचीच शिकार पालांदूर चौरास मंगेझरी गावात करण्यात आली. सोबतच त्याच भागात तीन चार वाघांची सुध्दा शिकार करण्यात आली हे चौकशीमध्ये स्पष्ट झाले आहे.
धक्कादायक ! वनमंत्र्यांच्या विदर्भात 5 वाघांची शिकार? सरकार करतंय काय? व्याघ्रप्रेमींचा संतप्त सवाल#Maharashtra #NavegaonNagziraTigerReserve #नवेगाव_नागझिरा @CMOMaharashtra pic.twitter.com/2UZi5JHhRa — Times Now Marathi (@timesnowmarathi) March 28, 2023
हे पण वाचा : कलिंगडच्या बिया वाढवतात शुक्राणूंची संख्या, तुम्ही ट्राय केलं का?
या व्याघ्र प्रकल्पातील इतरही काही वाघ गायब असल्याची माहिती आहे. मात्र, भीतीमुळे नाव नं सांगण्याच्या अटीवर या गावातील काही लोक खासगीत चर्चा करतात. त्यातच सध्या शासनाचे कोट्यवधी रुपए खर्च करून येथे बाहेरुन पाच वाघ आणण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु आपल्याकडे असलेल्या वाघांचीच सुरक्षा इथलं व्याघ्र प्रकल्प प्रशासन करू शकत नाही, जिथे वर्षभरात पाच वाघांची शिकार होते तर बाहेरुन वाघ आणण्याची आणि शासनाचे कोट्यवधी रुपए खर्च करण्याची काय आवश्यकता आहे ? असा संतप्त सवाल इथले व्याघ्र प्रेमी आणि गावकरी करत आहेत.
हे पण वाचा : 6 सेकंदात Google शोधून दाखवा, 95 टक्के होतात फेल
सदर घटना गंभीर असून वनविभाग, केंद्रीय व्याघ्र प्रकल्प वरिष्ठ यांच्यामार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. विदर्भातील वाघांची राजरोस शिकार करणाऱ्या टोळ्या पुन्हा कार्यरत झाल्याचे हे चिन्ह आहे. यामध्ये अधिकाऱ्यांच्या भूमिकेची सुद्धा चौकशी झाली नाही तर इथलं वन्यजीव आणि व्याघ्र प्रकल्प पर्यटन सुद्धा धोक्यात येण्याची लक्षणं दिसत आहेत.
हे पण वाचा : गरोदरपणात कारले खावे की नाही?
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात पसरलेला आहे. नागपूरपासून 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला 12 डिसेंबर 2013 मध्ये व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. या प्रकल्पात नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव वन्यजीव अभयारण्य, नागझिरा वन्यजीव अभयारण्य, नवीन नागझिरा अभयारण्य, कोको वन्यजीव अभयारण्य यांचा समावेश आहे.