Amravati Lockdown: अमरावतीमध्ये एका आठवड्यासाठी लॉकडाऊन

One-week complete lockdown in Amravati: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळेच स्थानिक प्रशासनाकडून अनेक गोष्टींवर निर्बंध लावण्यात येत आहेत. 

lockdown
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्रातील विविध भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला
  • दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत होतेय वाढ

अमरावती : महाराष्ट्रात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत आहे. विदर्भातील (Vidarbha) अमरावती जिल्ह्यासह इतरही भागांत कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी अमरावती शहरासह अचलपूरमध्ये एका आठवड्याचा लॉकडाऊन (One week lockdown in Amravati) जाहीर करण्यात आला आहे. अमरावती महानगरपालिका क्षेत्र आणि अचलपूर नगरपालिका क्षेत्रात २२ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या रात्री आठ वाजल्यापासून ते १ मार्चच्या सकाळी सहावाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे. वैद्यकीय आणि जीवनावश्यक सेवांना यामधून सूट देण्यात आली आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी ही माहिती दिली आहे.

सोमवारी (२२ फेब्रुवारी २०२१) सायंकाळपासून हा एका आठवड्याचा लॉकडाऊन लागू होणार आहे. या लॉकडाऊनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी देण्यात आली असून इतर सेवा, सुविधा, व्यवहार बंद राहणार आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नागरिकांना कोविड संदर्भातील दिलेल्या सूचना, नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अमरावती महानगरपालिका आणि अचलपूर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जीवनावश्यक दुकाने, किराणा, औषधी दुकाने, स्वस्त धान्य दुकाने ही सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहतील. दोन्ही शहरांतील सर्व प्रकारची बिगर जीवनावश्यक दुकाने, आस्थापना बंद राहतील. या दोन्ही शहरांत ज्या उद्योगांना सुरू ठेवण्यासाठी पूर्वी परवानगी देण्यात आली आहे ते उद्योग सुरू राहतील. सर्व आठवडी बाजार बंद राहतील.

अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, "अमरावती जिल्हा तसेच शहरामध्ये गत काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिका, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या लक्ष केंद्रित करुन कार्यवाही करावी. तसेच नागरिकांनी सुद्धा जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे निर्देश आज घेतलेल्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले."

कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे अमरावतीमध्ये वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार शनिवारी रात्री ८ पासून सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत हा वीकेंड लागू करण्यात आला होता. मात्र, आता अमरावती शहरात एका आठवड्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

नागपूर विभागातील कोरोनाची स्थिती (२० फेब्रुवारी २०२१ रोजीची आकडेवारी)

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

अकोला

८१

५०६७

१३६

अकोला मनपा

२६७

८६०८

२३७

अमरावती

२४९

९८५०

१८७

अमरावती मनपा

८०६

१९८३४

२४५

यवतमाळ

९२

१७०३२

४७१

बुलढाणा

१३९

१६३९६

२५४

वाशिम

९२

७८४३

१६१

अकोला मंडळ एकूण

१७२६

८४६३०

१२

१६९१

नागपूर

१६९

१६९६८

७७६

नागपूर मनपा

५४८

१२७०८६

२६८६

वर्धा

११२

११९४४

३०४

भंडारा

२०

१३७६४

३१३

गोंदिया

१४४७४

१७३

चंद्रपूर

१३

१५१९१

२४७

चंद्रपूर मनपा

१४

९२७५

१६४

गडचिरोली

८९३०

९९

नागपूर एकूण

८८३

२१७६३२

४७६२

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी