Nagpur: पूर आलेली नदी ओलांडताना प्रवाशांनी भरलेली स्कॉर्पिओ गेली वाहून, धक्कादायक VIDEO आला समोर

Nagpur rain car washed away in flood shocking video: नागपुरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. त्याच दरम्यान एक स्कॉर्पिओ गाडी नदीच्या पाण्यात वाहून गेल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. 

maharashtra rain scorpio washed away in flooded river in nagpur shocking video goes viral
Nagpur: पूर आलेली नदी ओलांडताना प्रवाशांनी भरलेली स्कॉर्पिओ गेली वाहून, धक्कादायक VIDEO आला समोर 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू
  • मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुरस्थिती, नागपुरात नदी ओलांडताना स्कॉर्पिओ गेली वाहून
  • वाहून गेलेल्या स्कॉर्पिओमध्ये सहा ते सात प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती

नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस (Heavy rainfall in Nagpur) सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागपुरातही मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसात पूर आलेल्या नदीवरुन स्कॉर्पिओ नेण्याचा प्रयत्न एका चालकाने केला आणि पुराच्या पाण्यात ती स्कॉर्पिओ वाहून गेली. स्कॉर्पिओ वाहून गेल्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. (Scorpio washed away in flooded river in Nagpur, shocking video goes viral)

गाडीत सहा ते आठ प्रवासी असल्याची माहिती

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नागपुरातील बामनमारी नदीला पूर आला आहे. या नदीच्या पुलावरुन एका चालकाने स्कॉर्पिओ नेली आणि पाण्याच्या प्रवाहात ती गाडी वाहून केली. या गाडीत एकूण सहा ते आठ प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. गाडी वाहून जाताच गाडीतील प्रवाशांनी मदतीसाठी आक्रोश सुरू केला.

 

काही अंतरावर जाऊन ही गाडी नदीच्या मधोमध पाण्यात अडकली. व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहे की, नदीच्या पाण्यात स्कॉर्पिओ अडकली आहे. तसेच गाडीत असलेल्या प्रवाशांचे हातही खिडकीतून बाहेर दिसून येत आहेत.

हे पण वाचा : Mumbai Crime: तरुणावर अनैसर्गिक अत्याचार, गुप्तांगावर मेणबत्तीचे दिले चटके आणि...

गाडी वाहून गेल्याची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि इतर प्रशासकीय अधिकारी दाखल झाले. त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. या गाडीतील काही प्रवासी वाहून गेल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज 

13 जुलै 

कोकण - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. 

मध्य महाराष्ट्र - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी अतिवृष्टीसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. 

मराठवाडा - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. 

विदर्भ - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता.

14 जुलै 

कोकण - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. 

मध्य महाराष्ट्र - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी अतिवृष्टीसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. 

मराठवाडा - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. 

विदर्भ - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी