Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर 'लालपरी' धावणार सुसाट; नागपूर-शिर्डी बस सेवेसाठी किती पैसे मोजावे लागणार अन् काय वेळापत्रक? वाचा

MSRTC will start ST buses on Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झाल्यावर आता या मार्गावरुन एसटी बसेस धावणार आहेत. यामुळे नागपूर - शिर्डी प्रवास नागरिकांचा सुसाट होणार आहे. 

Maharashtra ST buses will run on Samruddhi Mahamarg from Nagpur to Shirdi start from 15 december know fare schedule details in marathi
समृद्धी महामार्गावर 'लालपरी' धावणार सुसाट; नागपूर-शिर्डी बस सेवेसाठी किती मोजावे लागणार पैसे अन् काय वेळापत्रक? वाचा 
थोडं पण कामाचं
  • समृद्धी महामार्गावरून एसटी धावणार सुसाट
  • 15 डिसेंबर 2022 पासून होणार नागपूर - शिर्डी सेवा सुरू

ST buses will run on Samruddhi Mahamarg: हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण 11 डिसेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं. हा मार्ग नागरिकांच्या प्रवासासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या मार्गामुळे प्रवास खूपच सुसाट आणि सुखकर झाला आहे. या मार्गावरुन सर्वसामान्यांचा स्वस्तात मस्त प्रवास व्हावा यासाठी आता राज्य परिवहन महामंडळाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. (Maharashtra ST buses will run on Samruddhi Mahamarg from Nagpur to Shirdi starting from 15 December know fare schedule details in marathi)

प्रवाशांना जलद व आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणेसाठी एसटी महामंडळाकडून 15 डिसेंबर 2022 पासून नागपूर ते शिर्डी या मार्गावर शयन आसनी बससेवा सुरू करण्यात येत आहे. या बसमध्ये प्रवाशांना 2X1 पध्दतीची 30 आसने (पुशबॅक पध्दतीची) बसण्यासाठी उपलब्ध असून 15 शयन आसने (Sleeper)  आहेत.

हे पण वाचा : पुस्तके वाचण्याचे असंख्य फायदे, वाचाल तर वाचतच रहाल

किती वाजता सुटणार बस?

बससेवा ही नागपूर व शिर्डी या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री 9 वाजता सुटेल आणि पहाटे 5.30 वाजता गंतव्य ठिकाणी पोहोचेल. सदरच्या बससेवेमुळे प्रवाशांच्या सध्याच्या प्रवास अंतरात 102.5 कि.मी. आणि वेळेमध्ये 4.15 तास बचत होणार आहे. या बससेवेसाठी प्रति प्रौढ व्यक्ति रु. 1300/- आणि मुलांसाठी रू. 670 /- इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे. तसेच 75 वर्षावरील ज्येष्ठांना तिकिट दरात 100 % मोफत तर 65 ते 75 दरम्यानच्या ज्येष्ठांना 50 % सवलत असणार आहे.

हे पण वाचा : Vastu Tips: घरात कबूतर येणे शुभ की अशुभ? वाचा

याबरोबरच नागपूर ते औरंगाबाद (मार्गे जालना) या मार्गावरही समृध्दी महामार्गाव्दारे शयन आसनी बससेवा सुरू करण्यात येत आहे. ही बससेवा नागपूर आणि औरंगाबाद या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री 10 वाजता सुटेल. तसेच जालना मार्गे पहाटे 5.30 वाजता पोहोचेल. या बससेवेमुळे प्रवाशांच्या प्रवास अंतरात 50.9 कि.मी. आणि प्रवास वेळेमध्ये 4.40 तास इतकी बचत होणार आहे.

हे पण वाचा : बहुतेक स्वयंपाकघरात केली जाते ही चूक

तिकीट दर किती?

या बससेवेमुळे नागपूर ते औरंगाबाद या प्रवासासाठी प्रति व्यक्ति रु. 1100 /- आणि मुलांसाठी रु. 575/- इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे. तर नागपूर ते जालना या प्रवासासाठी प्रति व्यक्ति रु. 945 /- आणि मुलांसाठी रु. 505 /- इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी