ऑरेंज अलर्ट : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना

Weather Forecast and Warning: ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. इतकेच नाही तर काही जिल्ह्यांत ऑरेंज अलर्टही जाहीर करण्यात आला आहे. 

Rains
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

नागपूर : उन्हाळ्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांतील वातावरणात बदल झाल्याचं पहायला मिळत आहे. तसेच अवकाळी पाऊसही पडत आहे. त्यातच आता हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, गारा आणि वादळी वाऱ्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. (Maharashtra weather forecast orange alert issued for some districts in vidarbha)

हवामान विभागाने ज्या जिल्ह्यांत उद्या (१९ मार्च २०२१) ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे त्यामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर यल्लो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांत गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे. 

राज्यातील विभागानुसार पुढील हवामानाचा अंदाज

१९ मार्च २०२१ 

 1. कोकण - हवामान कोरडे राहण्याची शक्यता
 2. मध्य महाराष्ट्र - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडटकाटासह पावसाची शक्यता
 3. मराठवाडा - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडटकाटासह गारा पडण्याची शक्यता
 4. विदर्भ - ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडटकाटासह गारा पडण्याची शक्यता

पुढील काही दिवसांचा हवामानाचा अंदाज (१९ मार्च २०२१)

 1. नागपूर - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, गारा आणि वादळीवारा (वेग ३०-४० किमी प्रति तास).
 2. वर्धा -  एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, गारा आणि वादळीवारा (वेग ३०-४० किमी प्रति तास).
 3. भंडारा -  एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, गारा आणि वादळीवारा (वेग ३०-४० किमी प्रति तास).
 4. गोंदिया -  एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, गारा आणि वादळीवारा (वेग ३०-४० किमी प्रति तास).
 5. चंद्रपूर -  एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, गारा आणि वादळीवारा (वेग ३०-४० किमी प्रति तास).
 6. गडचिरोली - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकटासह मेघगर्जना आणि वादळ वारा (वेग ३०-४० किमी प्रति तास).
 7. अमरावती - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकटासह मेघगर्जना आणि वादळ वारा (वेग ३०-४० किमी प्रति तास).
 8. अकोला - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकटासह मेघगर्जना आणि वादळ वारा (वेग ३०-४० किमी प्रति तास).
 9. यवतमाळ - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकटासह मेघगर्जना आणि वादळ वारा (वेग ३०-४० किमी प्रति तास).
 10. बुलढाणा - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकटासह मेघगर्जना आणि वादळ वारा (वेग ३०-४० किमी प्रति तास).
 11. वाशिम - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकटासह मेघगर्जना आणि वादळ वारा (वेग ३०-४० किमी प्रति तास).

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी