Bhandara gang rape: महाराष्ट्र हादरला; महिलेवर सामूहिक बलात्कार, रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात अन् विवस्त्र आढळली

Woman gang raped in Bhandara: भंडाऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेवर सामूहिक बलात्कार करुन रस्त्यावर फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एका पुलाजवळ विवस्त्र अवस्थेत आढळून आली पीडित महिला
  • तिघांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार करुन रस्त्यावर फेकले 
  • दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक, एकाचा शोध सुरू

Maharashtra woman gang raped: भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि भयंकर अशी घटना समोर आली आहे. एका ३५ वर्षीय महिलेवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याचं वृत्त आहे. इतकेच नाही तर या आरोपींनी सामूहिक बलात्कार केल्यावर या पीडितेला विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर फेकून दिले आणि घटनास्थळावरुन पळ काढला. पीडित महिला रस्त्यावर विवस्त्र अवस्थेत आणि रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली. (Maharashtra woman gang raped in Bhandara gondia victim found lying naked on raod crime news in marathi)

भंडाऱ्यातील कारधा पोलीस स्टेशनच्या परिसरात असलेल्या एका पुलाजवळ ही महिला आढळून आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पीडित महिलेला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडित महिलेचा जबाब नोंदवण्यात आला असून पोलिसांनी आपला तपास सुरू केला.

अधिक उपचारासाठी पीडित महिलेला नागपुरातील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तात्काळ तपासासाठी आपल्या टीम तयार केल्या आणि आरोपींचा शोध सुरू केला. तीन आरोपींपैकी दोन आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तर एक आरोपी अद्यापही फरार आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून त्यालाही लवकरात लवकर अटक करण्यात येईल.

अधिक वाचा: क्राईम शो पाहून 10 वर्षांच्या मुलाने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, कारण ऐकून उडाली घरच्यांची झोप

भंडाऱ्यात निर्भयासारखी घटना - नीलम गोऱ्हे

भंडाऱ्यात मदतीचे आश्वसान देऊन एका ३५ वर्षीय विवाहित महिलेला जंगलात नेवून तिच्यावर अत्याचार करत मारहाण केल्याची धक्कादायक घडली. या प्रकरणाची वर्तमानपत्राने दखल घेतली मग कळाले. मी पोलीस महानिरीक्षक यांच्याशी बोलले आहे. अजूनही या प्रकरणातील एक आरोपी सापडला नाही. तिचे कुटुंब गरीब आहे. पीडितेच्या पाच शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत. शिवाय ही घटना निर्भया सारखी असून पीडितेची झुंज सुरू आहे असं निलम गोऱ्हे म्हणाल्या. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या घटनेची दखल घेतली नसल्याचंही निलम गोऱ्हे म्हणाल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी