ardha SUV Car Accident : वर्धा : देवळी (Deoli) येथून वर्धेला येत असताना सेलसुरा जवळ एका चारचाकी एक्सयुव्हीचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. एक्सयुव्ही (SUV Car) वाहनावरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात (Wardha) झाला आहे. या अपघातात मेडिकल कॉलेजच्या (Medical College) 7 विद्यार्थ्यांचा (Students) जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. कारवरील नियंत्रण सुटल्याने सेलसुरा जवळील नदीच्या पुलावरून कार खाली कोसळली. या पुलाची उंची साधरण 40 फूट असून कारमधील सर्व 7 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. पोलीस आणि प्रशासन अपघातप्रकरणी पुढील तपास करत आहेत. (major accident happened in wardha as 7 student reported dead)
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातातील सर्व मृतक 25 ते 35 वयोगटातील असल्याची माहिती मिळाली आहे. रात्री एक वाजता जवळपास अपघात झाला असून पहाटे चार वाजेपर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच वर्ध्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, सावंगी पोलिसी निरीक्षकही घटनास्थळी तातडीने दाखल झाले. या अपघातात मृत्यू झालेल्यांमधील सर्व विद्यार्थी हे सावंगी येथील मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आहेत. अपघातात दगावलेल्यांचे मृतदेह वर्धा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
राज्यातील भीषण अपघातांची मालिका सुरू आहे. पुणे-नगर महामार्गावर रविवारी भीषण अपघात झाला होता. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर दुसरीकडे परभणीत ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात तिघा भावंडांचा बळी गेला होता. अवघ्या 24 तासांत महाराष्ट्रातील रस्ते अपघात आठ जणांचा बळी गेला. अशातच सोमवारी रात्री आणखी एक भीषण अपघाताची घटना समोर आली असून आता रस्ते अपघातातील बळींचा आकडा आणखी वाढला आहे.