“ पुन्हा आमच्या वाट्याला गेलात, तर…”, बच्चू कडू यांनी दिला रवी राणांना इशारा

Mla bachchu kadu warn mla ravi rana ; 'जली को आग कहते है, बुझी को राख कहते है' म्हणत विरोधकांना आव्हान देत बच्चू कडू यांच्या प्रहार मोळाव्याला सुरुवात झाली. यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले, प्रहार हा आंडूपांडूंचा पक्ष नसून लढवय्यांचा पक्ष असल्याचे देखील बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

Mla bachchu kadu warn mla ravi rana
'जली को आग कहते है, बुझी को राख कहते है' - बच्चू कडू   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ही पहिली वेळ आहे. त्यामुळे आम्ही माफ करतो - बच्चू कडू
  • 'जली को आग कहते है, बुझी को राख कहते है' -बच्चू कडू
  • यापुढे कोणी 'वार' केला तर 'प्रहार' केल्याशिवाय थांबणार नसल्याचा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे

अमरावती  :  गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू (Bachchu Kadu) यांचा अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) व त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यामध्ये शा‍ब्दिक वाद सुरु आहे. आज बच्चू कडू  (Bacchu Kadu) यांच्या उपस्थितीत प्रहार संघटनेचा मोठा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बच्चू कडू यांनी राणा दांपत्याला मोठा इशारा दिला आहे. ही पहिली वेळ आहे. त्यामुळे आम्ही माफ करतो. पण आमच्या वाट्याला पुन्हा गेलात तर सोडणार नाही असा इशारा बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना दिला आहे. बच्चू कडू यांनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद संपणार नसल्याचे दिसून येत आहे.

अधिक वाचा ; भारत-बांगलादेश सामन्याआधी शाकीबच्या विधानाने मोठी खळबळ

'जली को आग कहते है, बुझी को राख कहते है' -बच्चू कडू

बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्यासोबत झालेल्या वादानंतर प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठक आयोजित केली होती. त्यानंतर मेळाव्याला बच्चू कडू यांनी संबोधित केले. मेळाव्याला संबोधित करताना बच्चू कडू यांनी राणा यांच्यासोबतच्या वादावर पडदा टाकत असल्याचे संकेत दिले. मात्र,  'जली को आग कहते है, बुझी को राख कहते है' म्हणत विरोधकांना आव्हान देत बच्चू कडू यांच्या प्रहार मोळाव्याला सुरुवात झाली. यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले, प्रहार हा आंडूपांडूंचा पक्ष नसून लढवय्यांचा पक्ष असल्याचे देखील बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. पहिली चूक आहे म्हणून माफ केलं पण यानंतर जर कोणी वार केला तर प्रहार केल्याशिवाय राहणार नाही असे म्हणत कडू यांनी राणा यांना स्पष्ट इशारा दिला. आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही. आणि आमच्या वाटेला कोणी लागले तर आम्ही सोडत देखील नसल्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.

अधिक वाचा ; कडूंच्या मेळाव्याच्या ठिकाणी झळकले 'मै झुकेगा नही' चे पोस्टर 

यापुढे कोणी 'वार' केला तर 'प्रहार' केल्याशिवाय थांबणार नसल्याचा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे

पहिली वेळ होती म्हणून माफ केल्याचे म्हणत बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्या दिलगिरीनंतर एक पाऊल मागे घेतले असल्याचे दिसून आले. मात्र, यापुढे कोणी 'वार' केला तर 'प्रहार' केल्याशिवाय थांबणार नसल्याचा इशाराही यावेळी कडू यांनी दिला. आम्ही कोणत्या पक्षाचा नव्हे तर विचारांचा झेंडा हाती घेतला आहे. पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, आम्ही राजकारणासाठी दिव्यांगांचा कधीही वापर केला नाही. तर आम्ही दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यासाठी लढलो. सत्तेसाठी कधीही लाचारी केली नाही. सत्ता आणि पदापेक्षा माझ्यासाठी माझी लोकं महत्त्वाची आहेत. मी महात्मा गांधी यांना मानतो. मात्र माझ्या डोक्यात भगतसिंग आहेत, त्यामुळे टीका करणाऱ्यांनी विचारपूर्वक बोलावे असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे आमच्यापासून सावध रहा. आम्ही सरकारमध्ये जरी असलो तरी, सहन झालं नाही तर सोडून जाऊ पण तुम्हाला सोडणार नसल्याचेही यावेळी ते म्हणाले.  

अधिक वाचा ; Remedies for PCOD: जाणून घ्या PCOD ची लक्षणे आणि उपचार

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी