Devendra Fadanvis शिंदे गटाच्या आमदाराने भाजपच्या मेळाव्यात फडणवीसांसोबत घातला भाजपचा गमछा

MLA of Shinde group wore BJP gamchha in BJP gathering : भविष्यात भंडारा नगरपरिषद ही भाजपची असेल, असा विश्वास नरेंद्र भोंडकर यांनी यावेळी बोलून दाखवला. त्याचबरोबर मी देवेंद्र फडणवीस यांना गुरुस्थानी मानतो. फडणवीसांमध्ये राज्याचेच नाही तर देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे नरेंद्र भोंडकर यांनी म्हटलं आहे.

MLA of Shinde group wore BJP gamchha in BJP gathering
शिंदे गटाच्या आमदाराने भाजपच्या मेळाव्यात भाजपचा गमछा घातला  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नरेंद्र भोंडेकर हे आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेळाव्याला उपस्थित
  • नरेंद्र भोंडेकर यांनी थेट आपल्या गळ्यात भाजपचा गमछा घातल्याचे पहायला मिळाले
  • भाजपच्या वतीने करण्यात आले होते मेळाव्याचं आयोजन

भंडारा : २ महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी शिवसेनेसोबत (shivsena) बंड करत आपला वेगळा गट स्थापन केला होता. शिंदे यांनी आपला वेगळा गट स्थापन करत भाजपचा पाठींबा घेत राज्याच्या मुखमंत्रीपद देखील मिळवले आहे. दरम्यान, शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार देखील सोबत असून, आणखी काही अपक्ष आमदार देखील शिंदेंच्या सोबत आहेत. या अपक्ष आमरांमध्ये नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) हे देखील आहेत. नरेंद्र भोंडेकर हे आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मेळाव्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी थेट आपल्या गळ्यात भाजपचा गमछा घातल्याचे पहायला मिळाले. भोंडेकर हे सध्या शिंदे गटाचे आमदार असून, देखील त्यांनी गळ्यात भाजपचा गमछा घातल्याने ते भारतीय जनता पार्टीत सहभागी होतात की काय? अशी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

अधिक वाचा ; इमारत कोसळून भीषण अपघात; ढिगाऱ्याखाली दबले कामगार, एक ठार

भाजपच्या वतीने करण्यात आले होते मेळाव्याचं आयोजन

दरम्यान, सदर मेळाव्याचे आयोजन हे भाजपच्या वतीने करण्यात आले होते. भंडाऱ्याचे भाजप खासदार सुनील मेंढे यांनी गेल्या तीन वर्षांत केलेल्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सहभागी झालेले अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर देखील सहभागी झाले होते. नरेंद्र भोंडेकर हे भंडारा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार आहेत. ते मंचावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला बसून गप्पा मारताना दिसले. विशेष म्हणजे, भाजपचा गमछा गळ्यात घालून त्यांनी मेळाव्याला लावलेली हजेरी उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होती. दरम्यान, त्यांनी गळ्यात भाजपचा गमछा घातल्याने ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

अधिक वाचा ; नागरिकांचा जीव मुठीत घेऊन ओढ्याच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास 

मी देवेंद्र फडणवीस यांना गुरुस्थानी मानतो – अपक्ष आमदार नरेंद्र भोंडकर

कार्यक्रमानंतर नरेंद्र भोंडकर यांनी माध्यमांना बोलताना म्हटलं आहे की,  भविष्यात भंडारा नगरपरिषद ही भाजपची असेल, असा विश्वास नरेंद्र भोंडकर यांनी यावेळी बोलून दाखवला. त्याचबरोबर मी देवेंद्र फडणवीस यांना गुरुस्थानी मानतो. फडणवीसांमध्ये राज्याचेच नाही तर देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे नरेंद्र भोंडकर यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा ; Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात किरण माने, म्हणजे राडा..

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी