Bharat Jodo Yatra राहुल गांधींच्या जाहीर सभेत मनसे दाखवणार काळे झेंडे, नाना पटोले म्हणाले....

MNS will show black flags at Rahul Gandhi's public rally ; मनसे काळे झेंडे दाखवणार असल्याचे नाना पटोले यांना पत्रकारांनी विचारल्यानंतर ते म्हणाले की, मनसे कोण? असा उपरोधी टोला देखील पटोले यांनी लगावला. ते आम्हाला काळे झेंडे दाखवत असतील तर आम्ही त्यांना गुलाबाचे फुल देऊ असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मनसेच्या विरोधाची हवा काढण्याचा प्रयत्न केला.

MNS will show black flags at Rahul Gandhi's public rally
राहुल गांधींच्या जाहीर सभेत मनसे दाखवणार काळे झेंडे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारत जोडो यात्रा आज बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश करणार
  • साडेसहा वाजता राहुल गांधींची जाहीर सभा देखील होणार आहे.
  • या सभेत मनसे काळे झेंडे दाखवणार

बुलढाणा : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) आज बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. आज दुपारी चार वाजता शेगाव इथं गजानन महाजारांचे दर्शन घेतल्यानंतर साडेसहा वाजता राहुल गांधींची जाहीर सभा देखील होणार आहे. दरम्यान, या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेगावच्या सभेत काळे झेंडे दाखवणार आहे. मनसे राहुल गांधी यांच्या सभेत काळे झेंडे दाखवणार असल्याने पोलिसांनी मनसैनीकांना 149 ची नोटीस बजावली आहे. उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अधिक वाचा ; बॅंक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप...एटीएमवरदेखील होणार परिणाम

राहुल गांधीच्या वक्तव्यावर राज्यातील वातावरण तापले

खासदार राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातलं वातावरण चांगलचं तापलं आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून भाजप रस्त्यावर उतरून राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन देखील करत आहे. त्याचबरोबर मनसे आणि शिंदे गटाने राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील आता राहुल गांधी यांच्या सभेत काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा मनसेने दिला आहे. त्यामुळे पोलीस अलर्ट मोडवर दिसत आहेत. त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावल्या असुन उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

अधिक वाचा ; चार वर्षे वडील, आजोबा, चुलत्याकडून 17 वर्षीय मुलीवर बलात्कार 

ते आम्हाला काळे झेंडे दाखवत असतील तर आम्ही त्यांना गुलाबाचे फुल देऊ – नाना पटोले

दरम्यान, मनसे काळे झेंडे दाखवणार असल्याचे नाना पटोले यांना पत्रकारांनी विचारल्यानंतर ते म्हणाले की, मनसे कोण? असा उपरोधी टोला देखील पटोले यांनी लगावला. ते आम्हाला काळे झेंडे दाखवत असतील तर आम्ही त्यांना गुलाबाचे फुल देऊ असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मनसेच्या विरोधाची हवा काढण्याचा प्रयत्न केला. मनसेने कितीही विरोध केला तरीही यात्रा रोखता येणार नाही, हे राहुल गांधी यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

अधिक वाचा ; 'या' निवडणुकीत महाविकास आघाडीचा डंका,10 पैकी 9 जागांवर विजयी 

अधिक वाचा ; राहुल गांधी बाळासाहेंबांना अभिवादन करतात का ? - बावनकुळे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी