राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला घेरण्याचा अयशस्वी प्रयत्न

Mob attempt to besiege Rashtriya Swayamsevak Sangh headquarters in Nagpur Article 144 imposed in the area : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला घेरण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली भारत मुक्ती मोर्चाने संघ मुख्यालयाला घेरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

Mob attempt to besiege Rashtriya Swayamsevak Sangh headquarters in Nagpur
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला घेरण्याचा अयशस्वी प्रयत्न  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला घेरण्याचा अयशस्वी प्रयत्न
  • संघाची विचारधारा ही भारतीय संविधानाला धरून नाही, असे सांगत मुख्यालय घेरण्याचा झाला प्रयत्न
  • आंदोलकांना पोलिसांनी पकडले

Mob attempt to besiege Rashtriya Swayamsevak Sangh headquarters in Nagpur Article 144 imposed in the area : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला घेरण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली भारत मुक्ती मोर्चाने संघ मुख्यालयाला घेरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पोलिसांनी वामन मेश्राम आणि भारत मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

संघाची विचारधारा ही भारतीय संविधानाला धरून नाही, असे सांगत भारत मुक्ती मोर्चाने संघ मुख्यालयाला घेरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. याआधी मोर्चा काढण्याचे निमित्त पुढे करून भारत मुक्ती मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते नागपूरमध्ये दाखल झाले. पोलिसांनी मोर्चा काढण्याला परवानगी नाकारली. उच्च न्यायालयानेही भारत मुक्ती मोर्चाला नागपूरमध्ये कोणतेही कार्यक्रम करण्यास बंदी घातली. पण या बंदीचे उल्लंघन करत भारत मुक्ती मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते संघ मुख्यालयाच्या दिशेने सरकत होते. पोलिसांनी रोखल्यामुळे कार्यकर्त्यांनी इंदोरा चौकामध्येच ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी कारवाई केली आणि अनेक कार्यकर्त्यांना तिथेच ताब्यात घेतले. यावेळी आंदोलकांनी संघाविरोधात घोषणाबाजी केली.

Mumbai Crime News : दसर्‍याच्या दिवशी मुंबईत घडली धक्कादायक घटना, विशीतल्या तरुणीसोबत...

Bigg Boss Marathi Season 4: घरामध्ये प्रसादला सारखं केलं जातंय टार्गेट?

नागपूरमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे पोलिसांनी भारत मुक्ती मोर्चा संघटनेला आंदोलनाची परवानगी नाकारली होती. उच्च न्यायालयानेही आंदोलनाची परवानगी नाकारली होती. कार्यक्रम करायचाच असेल तर सहा ते नऊ ऑक्टोबर दरम्यान पोलिसांकडे अर्ज करून कार्यक्रम आयोजित करण्यासाठी परवानगी मागावी असेही उच्च न्यायालयाने सांगितले. पण उच्च न्यायालयाचा निर्णय धुडकावत भारत मुक्ती मोर्चाने नागपूरमध्ये संघ मुख्यालय घेरण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई केली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी इंदोरा परिसरात कलम १४४ लागू केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी