खासदार भावना गवळींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; वादग्रस्त कंपनीचे संचालक सईद खान यांना अटक

नागपूर
भरत जाधव
Updated Sep 28, 2021 | 15:50 IST

गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्येच बदल करुन त्याचे कंपनीमध्ये रुपांतर करण्यात आल्याप्रकरणी या कंपनीचे संचालक सईद खान यांना अटक.

MP sentiment is likely to increase in Gawli’s difficulty
खासदार भावना गवळींच्या अडचणीत वाढणार होण्याची शक्यता  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • सोमवारी रात्री आठच्या सुमारास सईद खान यांना अटक
  • ज्या कंपनीच्या चौकशीसाठी खान यांना अटक करण्यात आली त्याच कंपनीमध्ये गवळी होत्या डायरेक्टर
  • भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मागील महिन्यात भावना गवळींवर 100 कोटींच्या घोटाळयाचा आरोप केला होता.

वाशीम: यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ होण्यायाची शक्यता आहे. कारण  गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्येच बदल करुन त्याचे कंपनीमध्ये रुपांतर करण्यात आल्याप्रकरणी या कंपनीचे संचालक सईद खान यांची काही दिवसांपूर्वी ईडीकडून चौकशी केली होती. आता सक्तवसुली संचालनालयाने सईद खान यांना अटक केली आहे. सोमवारी रात्री आठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र ही अटक बेकायदेशीर आहे, असा दावा त्यांचे वकील इंद्रपाल सिंह यांनी केला आहे.

खान यांनी ईडीकडून देण्यात आलेल्या सर्व सुचनांचे पालन करुन तपासात सहकार्य करत असतानाही ही अटक करण्यात आल्याबद्दल सिंह यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या अटकेमुळे भावना गवळी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ज्या कंपनीच्या चौकशीसाठी खान यांना अटक करण्यात आली  त्याच कंपनीमध्ये गवळी या डायरेक्टर होत्या. त्यामुळे आगामी काळामध्ये गवळी यांची या प्रकरणामध्ये चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

या प्रकरणात सुरू आहे चौकशी?

वाशीम जिल्ह्यातील महामार्गाच्या कामांमध्ये शिवसैनिक आडकाठी आणत असल्याची तक्रार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली होती. त्यानंतर गवळी यांनी 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. गवळींनी 55 कोटींचा बालाजी पार्टीकल बोर्ड हा कारखाना 25 लाख रुपयात घेतला आहे. सन 2019 मध्ये रिसोड येथील जनशिक्षण संस्था व महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या कार्यालयातून 7 कोटी रुपये चोरून नेल्याची तक्रार गवळी यांनी केली होती. 7 जुलै 2019 रोजीच्या चोरीची तक्रार 12 मे 2020 रोजी करण्यात आली.

दरम्यान, 10 महिने उशिरा तक्रार देण्याचे कारण काय? त्या कार्यालयात 7 कोटी कुठून आले? असे सवाल सोमय्या यांनी केले होते. या संदर्भात केंद्रीय सहकार मंत्री, सीबीआय, ईडी, स्टेट बँक, नॅशनल को-ऑप. डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व अन्य ठिकाणी तक्रारी केल्या आहेत. मुंबई येथील ईडीची पथके रिसोड येथे 30 ऑगस्ट रोजी सकाळी दाखल झाली. भावना गवळींच्या रिसोड अर्बन सहकारी पतसंस्था, आयुर्वेद महाविद्यालय, भावना पब्लिक स्कूल, डी.फॉर्म महाविद्यालय, पुंडलिकराव गवळी महाविद्यालय, शिरपूर जैन या संस्थांमध्ये धाडी टाकण्यात आल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी