MPSC Exam interview : मुंबई । महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (Maharashtra Civil Engineering Service)मुख्य परीक्षेची २०२० मुलाखत अमरावती येथे मंगळवारी ( दि.२५ जानेवारी २०२२) रोजी आयोजित करण्यात आली होती. या मुलाखतीच्या नियोजित कार्यक्रमाअंतर्गत ३,३५० ते ३,३७७ या क्रमांकांच्या २७ विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यात येणार होती. मात्र, प्रशासकीय कारणास्तव (Official reson)ही मुलाखत पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही मुलाखत आता २ फेब्रुबारी २०२२ ला अमरावतीलाच आयोजित करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे ट्विट करून कळविण्यात आले आहे.
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020-अमरावती येथे दिनांक 25 जानेवारी, 2022 रोजी आयोजित मुलाखती (मुलाखत क्रमांक 3350 ते 3377) प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहेत. सदर उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 2 फेब्रु. 2022 रोजी त्याच ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत.
अधिक वाचा : MPSC पूर्व परीक्षा रविवार २३ जानेवारीला होणार!
नेमके काय केले आहे ट्विट
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020-अमरावती येथे दिनांक 25 जानेवारी, 2022 रोजी आयोजित मुलाखती (मुलाखत क्रमांक 3350 ते 3377) प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहेत. सदर उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 2 फेब्रु. 2022 रोजी त्याच ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत. pic.twitter.com/XxFjlFxdkD — Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) January 24, 2022