वाशीम : दुर्गा मातेच्या मंदिरातील पुजाऱ्याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक घटना वाशीम जिल्ह्यात घडली आहे. मारोती लक्ष्मण पुंड असे हत्या झालेल्या पुजाऱ्याचे नाव आहे. मारोती पुंड हे दुर्गा मातेच्या मंदिरातील पुजारी होते. मारोती पुंड यांची धारधार शास्त्राने हत्या करण्यात आली आहे. वाशीम जिल्ह्यातील वाशीम ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केकतउमरा गावालगत सदर हत्येची घटना घडली आहे. वाशीम केकतउमरा रस्त्यावरून ये - जा करणारे प्रवासी मंदिर परिसरात विश्रांतीसाठी थांबत असत. त्यामुळे नेहमीप्रमाणे संशयित मंदिरात विश्रांतीसाठी थांबला आणि मारोती पुंड एकटे असल्याचा फायदा घेत धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यात आणि मानेवर वार करून हत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे.
अधिक वाचा : राज्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ, एका रुग्णाचा मृत्यू
दरम्यान, मिळालेली माहिती अशी आहे की, मारोती पुंड हे मंदिरातील मनोभावे सेवा करत होते. त्यांनी केकतउमरा रस्त्यालागत असण्याऱ्या आपल्या शेतात गेल्या १३ ते १५ वर्षापूर्वी दुर्गामातेच्या मंदिराची स्थापना केली होती. ते मंदिराची देखभाल आणि पूजाअर्चा करत असत. दरम्यान, मंदिर हे एकदम रस्त्यालगत असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत होते. त्यामुळे मंदिरात ठेवलेल्या दानपेटीत देखील बऱ्यापैकी रक्कम जमा होत होती. यासाठी मंदिरात तीन दानपेट्या लावण्यात आल्या होत्या. मिळालेल्या दानातून अन्नदान केलं जात असे. मात्र ही बाब चोरट्याच्या लक्षात आली. आणि त्यांनी मारोती पुंड हे मंदिरात एकटेच असल्याचा संधीचा फायदा घेत त्यांची हत्या करून, दोन दानपेट्या घेऊन फरार झाले आहेत.
अधिक वाचा ; शनीच्या वक्र चालीमुळे या राशीच्या समस्या वाढू शकतात
मंदिरातील तीन दान पेट्यांपैकी दोन पेट्या गायब असल्यामुळे चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान, तपासानंतर पुंड यांची हत्या कोणी आणि का केली हे स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले आहे. मारोती यांचा मुलगा वडिलांना झोपेतून उठवण्यासाठी नेहमीप्रमाणे सकाळी मंदिरात गेला असता वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. वडिलांना रक्स्ताच्या थारोळ्यात पाहून गणेश प्रचंड घाबरला. घाबरलेल्या गणेश याने याबाबत गावातील नागरिकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर नागरिकांनी याबाबत पोलिसांना कळवले. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटना स्थळी डॉगस्कोड आणि फिगर एक्स्पर्ट तज्ञांसह पाहणी केली. दरम्यान, वाशीम स्थानिक गुन्हे शाखा आणि ग्रामीण पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
अधिक वाचा : 'प्रांतअधिकारी दादासाहेब कांबळे दोन टक्के कमिशन घेतात'